जस्टिन बीबरच्या राजेशाही थाटाची यादी लीक ; हव्यात 100 गाड्या, हेलिकाॅप्टर, जॅकुझी आणि अख्खं हाॅटेल...

जस्टिन बीबरच्या राजेशाही थाटाची यादी लीक ; हव्यात 100 गाड्या, हेलिकाॅप्टर, जॅकुझी आणि अख्खं हाॅटेल...

.या टूरसाठी जस्टिनला 10 लक्झरी गाड्या हव्या आहेत शिवाय दोन व्होल्वो बसेस. त्यात त्याचा 120 जणांचा स्टाफ फिरेल तर खुद्द जस्टिनसाठी रोल्स रॉईस ही गाडी मागितली गेली आहे

  • Share this:

चित्राली चोगले,मुंबई

05 मे : कनेडिन गायक जस्टिन बीबर त्याच्या पहिल्या भारतीय कॉन्सर्टसाठी लवकरच मुंबईत येणार आहे. त्याच्या कॉन्सर्टच्या तिकीटांचा खप तर जोरात सुरू आहे. त्याचे भाव सुद्धा जसजसा कॉन्सर्ट जवळ येतोय तसे वाढत चालले आहेत. हे सुरू असतानाच जस्टिन बीबरने भारतात येण्याच्या आधी एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलाय ज्याची एक प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात जस्टिनच्या काही मागण्या खास अधोरेखित केल्या गेल्या आहेत. या कॉन्ट्रॅक्टमध्ये वाट्टेल त्या मागण्या केल्याचं दिसतंय.

जस्टिन बीबरची गाणी फारच लोकप्रिय आहेत. तो पहिल्यांदा भारतात येऊन लाईव्ह कॉन्सर्ट करणार म्हटल्यावर त्याचे फॅन्स तर सुखावलेच...त्याच्या कॉन्सर्टच्या तिकीटांचा दर महाग असूनही तिकीटांची मागणी वाढतेय. आता इतका लोकप्रिय आणि प्रसिद्ध आर्टिस्ट म्हणजे त्याच्याही काही मागण्या असणं साहाजिकंच आहेत. जस्टिनच्या या भारतीय टूरच्या कॉन्ट्रक्टमध्ये त्याच्या मागण्या नमुद करण्यात आल्या आणि त्या वाचून यावर हसावं की रडावं हे त्याच्या टूर मॅनेजर्स नक्कीच कळेत नसेल.

या मागण्यांचा इतका गाजा वाजा का होतोय त्याचं उत्तर म्हणजे जस्टिनच्या मागण्यांची न संपणारी लिस्ट....या टूरसाठी जस्टिनला 10 लक्झरी गाड्या हव्या आहेत शिवाय दोन व्होल्वो बसेस. त्यात त्याचा 120 जणांचा स्टाफ फिरेल तर खुद्द जस्टिनसाठी रोल्स रॉईस ही गाडी मागितली गेली आहे. शिवाय त्याची 8 जणांची सिक्युरिटी वेगळी असताना सुद्धा त्याला महाराष्ट्र पोलिसांकडून Z दर्जाची सिक्युरिटी देण्यात येईल.

या व्यतिरिक्त 10 मोठे कंटेनर मागवले गेले आहेत. ज्यामध्ये पिंग पाँग टेबल, व्हिडिओ गेम्स स्टेशन, सोफा सेट, वॉशिंग मशीन, फ्रीज, कपाटं इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. या सगळ्या गोष्टी बॅकस्टेजला ठेवण्यात येतील अशी मागणी आहे. तर जस्टिनसाठी एक खास जॅकुझी सुद्धा या बॅकस्टेजला तयार केली जात आहे. या शिवाय ही अशा अनेक नको त्या गोष्टींचा या लिस्टमध्ये समावेश आहे.

तर त्याच्या रहाण्यासाठी 2 पंच तारांकित हॉटेल बुक केली गेली आहेत. जस्टीनरहात असलेली 1000 स्केअर फुटाची रुम मात्र त्याच्या सोयीने नव्याने डिझाईन केली गेली आहे. त्याला दिलेल्या जेवणाची जबाबदारी अनेक नावाजलेले शेफ सांभाळणार आहेत. दररोज 5 विविध पदार्थ ते ही त्याच्या गाण्यांची नावं या सगळ्या पदार्थांना देण्यात येणार आहे.

या पंचतारांकित हॉटेलमध्ये जस्टिन रहात असताना त्याच्या आणि त्याच्या स्टाफ शिवाय दुसऱ्या कोणाला सुद्धा आत येण्यास परवानगी नसेल. त्याच्यासाठी खासगी लिफ्ट असेल तर त्याच्या रुमनमध्ये योगा करण्यासाठी लागणारी खास भारतीय सामग्री ठेवली जाईल. त्याच्या या संपूर्ण टूर दरम्यान केरळहुन जस्टिनच्या मसाजसाठी एक व्यक्ती बोलवली जाईल जी पूर्णवेळ जस्टिनसोबत असेल.

या शिवाय अनेक खाण्याचे पदार्थ आणि प्रकार त्याच्या रुममध्ये आणि बॅकस्टेज त्याने तयार ठेवण्यास सांगितलं आहे. मग ते ऑरगॅनिक केळी असो किंवा रान्च सॉसमध्ये तयार केलेल्या भाज्या किंवा मग काही खास प्रकाचे चिझ किंवा विशेषतः व्हाईट स्लाईस ब्रेड, कलिंगड फ्लेवरचं च्युईंग गम, त्याची फेव्हरेट चॉकलेटस् बदाम पिस्टा वगैरे वगैरे वगैरे...

त्याच्या बॅकस्टेजच्या रुममध्ये विविध प्रकाचे कोल्ड ड्रिंक पाण्याच्या बाटल्या, आईसक्रीम सोडा, व्हिटामिन वॉटर असं पिण्यासाठीच्या गोष्टी तयार ठेवण्यात येतील. तर रुममध्ये फक्त पांढरे पडदे असतील आणि 12 पांढरे रुमाल त्याला लागतील. या शिवाय सुद्धा अनेक वेग वेगळ्या ब्रॅण्डचे विविध ड्रिंक्स त्याने या लिस्टमध्ये मागितले आहेत. काही गोष्टी त्याच्या नजरेस ही पडू नये अशी त्याने सक्त ताकीद दिली आहे...जसे त्याला पांढरे लिलीची फुलं आवडत नाहीत तर ती त्याला या चार दिवसात अजिबात दिसता कामा नये असं त्याने नुमद केलंय.

या शिवाय त्याच्यासाठी खास प्राईव्हेट जेट आणि प्राईव्हेट हेलिकॉप्टर सुद्धा तयार ठेवण्यात येतील. जस्टिनला ऐनवेळी कुठे जाण्यास किंवा त्याची ऐनवेळी आलेली मागणी पूर्ण करण्यासाठी

...तर त्याच्या या वाट्टेल ते आणि अनावश्यक अशा मागण्या हे सोशल मीडियावर निव्वळ विनोदाचं कारण ठरत आहे. यावरुन त्याची खिल्लीच उडवली जात आहे. आता तो भारतात येईल त्याच्या या डिमान्डस् पूर्ण ही होतील पण त्यानंतर ही हे विनोद आणि या चर्चा काही थांबणार नाहीत कारण त्याच्या मागण्याच अशा आहेत की त्यावरटिप्पणी करण्याच मोह कुणालाच आवरणार नाही तर जस्टिनचा हा कॉन्सर्ट येत्या 10 मे रोजी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये पार पडेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2017 11:13 PM IST

ताज्या बातम्या