नासाडी...नासाडी म्हणणाऱ्यांनो, हे पाहा लाखोंचा टोमॅटो शेतावरच पडून आहे !

हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाही हे सांगणाऱ्या राजकीय नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी गोष्ट आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2017 10:03 PM IST

नासाडी...नासाडी म्हणणाऱ्यांनो, हे पाहा लाखोंचा टोमॅटो शेतावरच पडून आहे !

रायचंद शिंदे, जुन्नर

02 जून : शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतलं, शेतीमाल रस्त्यावर फेकला म्हणून नासाडी करू नका असा उपदेशाचा डोस पाजणारी डोकी सोशलमीडियावर वर आलीये. एवढंच नाहीतर शेतकरी स्वतःचा शेतमाल रस्त्यावर फेकत नाही असा आरोप सत्ताधारीच करतायेत. पण जुन्नरमध्ये लाखो रुपयांचे टोमॅटो शेतात पडून आहेत. शेतकरी मात्र आंदोलनावर ठाम आहे.

जुन्नर तालुक्यातील शेताचे बांध हे असे लाल झालेत. शेतकऱ्यांचा संप सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात न नेता शेताच्या बांधावरच फेकून दिलेत. टोमॅटोच्या तोडणीचा हंगाम सुरू आहे. रोपं पिकलेल्या टॉमेटोंनी लालबुंद झालीयेत.

रोपं टोमॅटोंच्या वजनानं तुटू नयेत यासाठी शेतकरी टोमॅटो तोडून फेकून देतायेत. डोळ्यांदेखत हजारोंचं नुकसान होत असताना शेतकरी मात्र संपावर ठाम आहेत.

जे शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरलेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतातले शेतकरी स्वतःचं नुकसान सोसतायेत. हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाही हे सांगणाऱ्या राजकीय नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी गोष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 10:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...