पुणे तिथे एक रन उणे! IPL 10च्या फायनलनंतर सोशल मीडियावर जोक्सचा धुमाकूळ

पुणे तिथे एक रन उणे! IPL 10च्या फायनलनंतर सोशल मीडियावर जोक्सचा धुमाकूळ

  • Share this:

23 मे : पुण्याची टीम आयपीएल फायनल हरली...आणि व्हॉट्स अॅपवर जोक्सचा पाऊस सुरु झाला....बघूया पुणेकरांची व्हॅट्स अॅपवर कशी फिरकी घेतलीये ते.

मुंबई-पुण्याचा सांस्कृतिक वाद... आयपीएलच्या निमीत्तानं पुन्हा पुढे आला. आणि एक रननं मुंबईनं मॅच जिंकली आणि मग व्हॅट्स अॅपवर जोकचा पाऊसच सुरु झाला. पहिले तर हीट झाल्या या आजीबाई... या आजींनीच पुण्याला हरवल. मग हा पुणेकरांना टोमणा "एका बॉलमध्ये चार रन्स शक्यच नव्हेत पुण्याला...1 ते 4 पुणेकरांची झोपायची वेळ असते".

टोमणे मारणं आणि सिक्स मारणं यात फरक आहे हे कोण समजवेल पुणेकरांना... - मुंबईकर

आता पुणेकरांच बदललेलं वाक्य, पुणे तिथे एक रन उणे

रात्री 10 च्या नंतर पुण्यातील सगळी मंडळी झोपली म्हणून देवाकडे प्रार्थना पोहचली नाही आणि त्यामुळे आमचा पराभव झाला, कर्णधार स्मिथ ची प्रतिक्रिया.

पुणेकरांना दोनच गोष्टी, माहिती आहेत, 'MH12, फायनल हारा'

मग थोडं पुणेकरांना सावरणारेही जोक्स आले.

पुण्याने मन जिंकल ट्रॉफी तर लक्ष्मीरोडला पण बनवून मिळेल.

दोन्ही टीमनी हरण्याचे प्रयत्न केले त्यात पुण्याचा विजय झाला!!

- पुण्याचा पॉझिटिव्ह  अॅटिट्यूड

मुंबई-पुणे फायनलमध्ये खेळाडूंसोबत या जोक्सनीही रंगत भरली.

First published: May 23, 2017, 2:09 PM IST

ताज्या बातम्या