आॅपरेशन थिएटरमध्येच दोन डाॅक्टरांचं कडाक्याचं भांडण, नवजात बाळाचा मृत्यू

. जोधपूरमध्ये एका हाॅस्पिटलच्या आॅपरेशन थिएटरमध्येच दोन डाॅक्टर कडाक्याचं भांडण करत होते

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2017 01:37 PM IST

आॅपरेशन थिएटरमध्येच दोन डाॅक्टरांचं कडाक्याचं भांडण, नवजात बाळाचा मृत्यू

30 आॅगस्ट : रुग्णांना जीवनदान देणाऱ्या डाॅक्टरच जर भांडायला लागले तर...होय, डाॅक्टर साहेब तुम्ही सुद्धा असं म्हणण्याची वेळ राजस्थानमध्ये आलीये. जोधपूरमध्ये एका हाॅस्पिटलच्या आॅपरेशन थिएटरमध्येच दोन डाॅक्टर कडाक्याचं भांडण करत होते. धक्कादायक म्हणजे या दोन डाॅक्टरांच्या वादात एका नवजात बाळाचा मृत्यू झालाय.

शहरातील उम्मेद हाॅस्पिटलमध्ये डाॅक्टर अशोक नैनीवाल आणि एनेस्थेटिक डाॅक्टर एमएल टाक यांच्या भांडणाचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्य दोन्ही डाॅक्टर आपसात चांगलेच भिडले आहे. जेव्हा या दोन डाॅक्टरांचं भांडण सुरू होतं तेव्हा आॅपरेशन थिएटरच्या टेबलवर एक महिली बेशुद्ध पडलेली होती. महिलेची परिस्थिती पाहता तत्काल सर्जरीची आवश्यकता होती. पण डाॅक्टरांनी भांडणात धन्यता मानली.

डाॅक्टरांच्या या आपसातील भांडणामुळे महिलेच्या आॅपरेशनला उशीर झाला. त्यामुळे नवजात बाळाचा जन्मानंतर काही तासांतच मृत्यू झालाय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हाॅस्पिटल प्रशासनाने दोन्ही डाॅक्टरांना निलंबित केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2017 01:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...