S M L

लष्करात नोकरीचं आमिष देऊन 300 तरुणांना 7 कोटींना गंडा, लष्कर अधिकारी अटकेत

या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात एका लष्करी अधिकाऱ्याला कुंटुंबासह अटक करण्यात आली आहे.

Sachin Salve | Updated On: Feb 26, 2018 07:13 PM IST

लष्करात नोकरीचं आमिष देऊन 300 तरुणांना 7 कोटींना गंडा, लष्कर अधिकारी अटकेत

राजेश भागवत, जळगाव

जळगाव, 26 फेब्रुवारी : लष्करात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 300 तरुणांना 7 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात एका लष्करी अधिकाऱ्याला कुंटुंबासह अटक करण्यात आली आहे.

लष्करात नोकरीचं अमिष दाखवून अनेक तरुणांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक करणारा हा आहे हुसनोद्दीन चांदभाई शेख. हा व्यक्ती तवांगमधील इंजिनिअरींग रेजिमेंटला सुभेदार पदावर काम करतो. या अधिकाऱ्याने नोकरीच्या नावाखाली थोडीथोडकी नाही तर 7 कोटी रुपयांना फसवणूक केली आहे.

सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेखची फसवणूक करण्याची पद्धत देखील अनोखी. शहरा शहरात जाऊन लष्करात रूजू होण्यासाठी मार्गदर्शन शिबिरं भरवायचा आणि मग तिथे येणाऱ्या तरुण वर्गाला विश्वासात घेऊन नोकरी देण्याचं आश्वासन दिलं जायचं. या बहाद्दरने तर लष्कराची खोटी नियुक्तीपत्रही काहींना देऊ केली.

सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेखने एवढे पैसै घेऊन नेमके कोणाला दिले की स्वत: खर्च केले याचा पोलीस तपास करताहेत

Loading...

या तपासात खुद्द शेखने काही नावं सांगितली आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी शेखचा मुलगा वजीर आणि पत्नी रेश्मा यांनाही अटक केली आहे. आता यामागे मोठं रॅकेट आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2018 07:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close