S M L

व्हिडिओ गेमिंग वेड्या अक्षयची भरारी, जेईईत राज्यात पहिला देशात सातवा!

गेमिंगचा प्रचंड वेड असलेला अक्षत भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि गणितात ही पारंगत आहे. या परीक्षेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती.

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2017 10:07 PM IST

व्हिडिओ गेमिंग वेड्या अक्षयची भरारी, जेईईत राज्यात पहिला देशात सातवा!

वैभव सोनवणे,पुणे  

28 एप्रिल : अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या जॉईंट एंट्रन्स एक्झाममध्ये पुण्याचा अक्षत चुग हा राज्यात पहिला तर देशात सातवा आलाय. गेमिंगचा प्रचंड वेड असलेला अक्षत भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि गणितात ही पारंगत आहे. या परीक्षेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती.

कॉम्प्युटर गेमिंगचा प्रचंड वेड असूनही गेले आठ महिने केवळ आणि केवळ दिवसातले आठ तास अभ्यास करणारा पुण्याच्या कोंढवा एनआयबीएम परिसरात राहणार अक्षय चुग हा जेईईमध्ये ३५७ मार्क्स मिळवत राज्यात पहिला तर देशात सातवा आलाय. दिल्ली पब्लिक स्कुलचा विद्यार्थी असलेल्या अक्षयने दहावीला ९८. टक्के इतके मार्क्स मिळवलेत.प्रचंड फोकस असलेला अक्षत दहावीची परीक्षा झाल्यानंतर जेईई च्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी त्याने खाजगी क्लासेसची ही मदत घेतली. दिवसभरात सतत आठ तास तो परीक्षेचा अभ्यास करत होता. त्याने कॉम्पुटर गेम्सचा छंद ही बाजूला ठेवला होता.

कठोर परिश्रम केलेल्या अक्षतचं पुढचं ध्येय हे आयआयटीतून पुढचं शिक्षण पूर्ण करण्याचा मानस आहे. कॉम्प्युटरमध्ये इंनोवेटिव्ह इंजिनियरिंग चे प्रोजेक्ट त्याला पूर्ण करायचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 10:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close