वीज बिलाच्या धास्तीने डिझेल इंजिन बसवले, धुरामुळे गुदमरुन बापलेकासह तिघांचा करूण अंत

वीज बिलाच्या धास्तीने डिझेल इंजिन बसवले, धुरामुळे गुदमरुन बापलेकासह तिघांचा करूण अंत

थकीत विज बिलापोटी कृषी पंपांची वीज तोडण्याचे सत्र अद्यापही सुरू असून, वीज टिकत नसल्याने शेतकरी इंजिनद्वारे पिकांना पाणी देवून पिकं जगविण्याची धडपड करताहेत

  • Share this:

15 नोव्हेंबर : थकीत विज बिलापोटी कृषी पंपांची वीज तोडण्याचे सत्र अद्यापही सुरू असून, वीज टिकत नसल्याने शेतकरी इंजिनद्वारे पिकांना पाणी देवून पिकं जगविण्याची धडपड करताहेत. अशाच प्रकारे जालना इथं विहिरीतील इंजिनच्या धुरामुळे गुदमरुन शेतकरी बाप लेक आणि युवा शेतकरी असं तिघांचा करुण अंत झाल्याची ह्रदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी घडलीये. या तिघांना वाचवण्यासाठी गेलेले तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गेल्या महिन्याभरापासून परिसरात 12-12 तास भारनियमन सुरू असून वीज टिकत नाहीये. सध्या पिकांना पाणीभरणीचा काळ आहे परंतु वीज नसल्याने शेतकरी इंजिनचा वापर करून पिके जगवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. दैठणा इथले बाबासाहेब बापूराव वाबले (वय 50) यांचे दुधना काळेगाव ते दैठणा रस्त्यावर शेत आहे. या शेतातील 8 फुट रुंद आणि 50 फुट खोल विहीर असून या विहिरीत इंजिन बसवण्याचा निर्णय घेतला. यासाठी काल इंजिन खरेदी केले.

बाबासाहेब आणि त्यांचा मुलगा रामेश्वर वाबले (28) आणि शेजारच्या शेतातील अर्जुन साहेबराव धांडे (वय 30) हे तिघे विहिरीतिल फाउंडेशनवर इंजीन बसविण्याठी दोरीच्या सहाय्याने उतरले. बाबासाहेब यांचा दुसरा मुलगा परमेश्वर वाबले आणि भाऊ आसाराम वाबले, रामकिशन धांडे हे वर थांबलेले होते. इंजिन सुरू केल्यानंतर काही कळण्याच्या आतच इंजीनमधून एवढा धुराळा निघाला की विहिरीतिल तिघांचा गुदमरुण मृत्यू झालाय. तर वरती थांबलेल्या तिघांना धुरामुळे काहीच समजले नाही. आवाज दिल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्याने तिघेही आत उतरले.. त्यांनाही गुदमरल्यासारखे झाले. ते देखील धुरामुळे जखमी झाले. कसेबसे विहिरीच्यावरती निघुन आले.

विजवितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे तीन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने याला सर्वस्वी विद्यमान सरकार जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

दरम्यान, याप्रकरणी जिल्ह्यातील सर्वपक्षिय नेते, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांसह मयतांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको केला. उर्जामंत्री बावनकुळे यांच्यासह विज वितरण कंपणीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 09:11 PM IST

ताज्या बातम्या