वाजंत्री आणि वऱ्हाडी मंडळीच्या डोळ्यावर पट्टया, एका लग्नाची अशीही गोष्ट !

वाजंत्री आणि वऱ्हाडी मंडळीच्या डोळ्यावर पट्टया, एका लग्नाची अशीही गोष्ट !

योगेश आणि स्वाती या अंध जोडप्याचं याठिकाणी लग्न लावण्यात आलं. योगेश आणि स्वातीला भलेही डोळ्यांनी दिसत नसलं तरीही या दोघांनी आता एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय

  • Share this:

रोहिदास घाडगे, आळंदी

13 मे : आळंदीमध्ये शुक्रवारी एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. दोन अंध जीवांना एकत्र आणायचं काम एका संस्थेमार्फत करण्यात आलं.

ही आहे देवाची भूमी आळंदी...असं म्हणतात लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात. म्हणूनच की काय याच आळंदीत एक आगळा-वेगळा विवाह सोहळा पार पडलाय. योगेश आणि स्वाती या अंध जोडप्याचं याठिकाणी लग्न लावण्यात आलं. योगेश आणि स्वातीला भलेही डोळ्यांनी दिसत नसलं तरीही या दोघांनी आता एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. या दोन जीवांना एकत्र आणायचं काम केलंय भोसरीच्या जागृती सोशल फाऊंडेशन या संस्थेनं.

साखरपुड्यापासून ते विवाह सोहळ्यापर्यंत जागृती संस्थेनं या दोघांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण अगदी आनंदानं पार पाडला. प्रत्येक परंपरा जपत अगदी हळदीपासून ते वरातीतल्या बँड-बाजापर्यंत सर्वच तयारी फार सुंदर होती. या लग्नाचं अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे वराची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. मात्र वधु-वर अंध असल्यानं या लग्नात आलेल्या प्रत्येकानं आपल्या डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून वधु-वराला अक्षतांच्या रूपानं आशिर्वाद दिला.

आपण अनेकवेळा राजकारण्यांचे शाहीसोहळे पाहतो. अनेक मोठ-मोठी लग्न होत असतात. मात्र, अशा घटकांसाठी आपण काहीतरी वेगळं आणि त्यांना आनंद मिळेलं असं करणं फार महत्त्वाचं आहे. तर ज्यांनी जग म्हणजे काय हे पाहिलेलंच नाही त्यांच्यासाठी हा विवाहसोहळा फारच सुखद होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 10:33 PM IST

ताज्या बातम्या