जवान तुझे सलाम,तब्बल 30 किमीपर्यंत हर्षदचा मृतदेह खांद्यावर आणला वाहून !

5 ते 6 फूट बर्फ साचलेल्या हिमालयीन पर्वतांना पार करून ट्रेकर्सला रेस्क्यू करणं अत्यंत अवघड होतं. मात्र जवानांनी हे आव्हान पेललं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2018 06:31 PM IST

जवान तुझे सलाम,तब्बल 30 किमीपर्यंत हर्षदचा मृतदेह खांद्यावर आणला वाहून !

सागर वैद्य, नवी दिल्ली

16 जून : हिमालयीन पर्वतात ट्रेकिंगसाठी गेलेला महाराष्ट्रातला ट्रेकर्सचा ग्रुप मरणाच्या दारातून परत आलाय. हिमालयीन पर्वतात बेपत्ता झालेल्या या ग्रुपला 48 तासाच्या खडतर शोधमोहिमेनंतर आयटीबीपी (भारत तिबेट सीमा पोलीस)च्या जवानांनी सहीसलामत रेस्क्यू करून आणलंय. दुर्दैवाने आयटीबीपीचे जवान पोहचण्यापूर्वीच हर्षद दत्तात्रय आपटे या ट्रेकर्सचा मृत्यू झाला होता. पण तब्बल 30 किलोमीटर हर्षदचा मृतदेह आयटीबीपीच्या जवानांनी खांद्यावर वाहून खाली आणला आणि संपूर्ण देशाने पुन्हा एकदा आयटीबीपीच्या जवानांच्या शौर्य आणि देशातील नागरिकांप्रति असलेल्या प्रेमाला सलाम केला.

'गो हिमालय' या मोहिमेंतर्गत ट्रेकर्सचा एक ग्रुप उत्तराखंडातील संकारी ते हिमाचल प्रदेशातील किनौर या ट्रेकला निघाला होता. 23 जणांच्या या ग्रुपमध्ये 12 ट्रेकर्स, 1 गाईड, 10 पोर्टर्स होते. 12 ट्रेकरमध्ये मुंबईतील 8, फरिदाबादचा 1 आणि 2 विदेशी नागरिक होते. मात्र मुसळधार पाऊस, धुळीचे वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे हा ग्रुप भरकटला. 3 दिवसापूर्वी या ग्रुपने मदतीसाठी आयटीबीपीच्या 50व्या बटालीयनला कॉल केला होता. त्यांनतर लगेच 60 जवानांचा समावेश असलेले आयटीबीपीचे पथक या ट्रेकर्सच्या शोधमोहिमेला निघाले.

शुक्रवारी सकाळी बरशु पास पॉईंट जवळ जवानांना हर्षल आपटे या ट्रेकरचा मृतदेह सापडला. त्यांनतर उरलेल्या ट्रेकर्सला जवानांनी शोधून काढला. अंत्यत ग्लानी अवस्थेत असलेले हे ट्रेकर मरणाच्या दारात आणि भीतीच्या छायेत होते. मात्र जवानांनी त्यांना धीर दिला आणि मग सुरू झालं

Loading...

रेस्क्यू ऑपरेशन...

5 ते 6 फूट बर्फ साचलेल्या हिमालयीन पर्वतांना पार करून ट्रेकर्सला रेस्क्यू करणं अत्यंत अवघड होतं. मात्र जवानांनी हे आव्हान पेललं. मृत हर्षद आपटे याचा मृतदेह तब्बल 30 किलोमीटर खांद्यावर वाहून ट्रेकर्सला आधार देऊन जवानांनी नागस्ती आयटीबीपी पोस्ट पर्यंत सुरक्षित पोहचवलं. सुमारे 72 तास या 60 जवानांनी शर्थ करून या ट्रेकर्सचे प्राण वाचवले.

बदलापूरच्या ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू

या मोहिमेतील मयुरेश -मृन्मयी जोशी, जयेश- प्रशांत आपटे, कौशल, स्नेहज रीना, संजय (सर्व राहणार ठाणे, मुंबई), मोंजॉन - एक्युलर (विदेशी नागरिक) आदी ट्रेकर्सला आयटीबीपीच्या जवानांमुळे जीवदान मिळालं. आयटीबीपीच्या जवानांच्या सेवा शौर्याला न्यूज18चा सलाम....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2018 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...