मुंबई ते इजिप्त, किडनी विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई ते इजिप्त, किडनी विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई ते कैरो असं हे रॅकेट सुरू होतं. यातून दोन लोकांच्या किडनी वाचवण्यातही पोलिसांना यश आलंय.

  • Share this:

09 आॅक्टोबर : मुंबई पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट उद्ध्वस्त केलंय. मुंबई ते कैरो असं हे रॅकेट सुरू होतं. यातून दोन लोकांच्या किडनी वाचवण्यातही पोलिसांना यश आलंय.

मुंबईत पुन्हा आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा पर्दाफाश झालाय.  या रॅकेटचा सुत्रधार सुरेश प्रजापतीसह दोघांना पोलिसांनी अटक केलीये. किडनी विकणारे हेरून त्यांना इजिप्तची राजधानी कैरो इथं नेलं जायचं तिथंच त्यांची किडनी काढून घेतली जायची. त्याच्या मोबदल्यात त्यांना पाच ते सहा लाख रुपये मिळत होते.

किडनी विकणारे पाच जण आणि किडनी विकत घेणाऱ्या पाच जणांचा पोलिसांना शोध लागलाय. यापूर्वी हे किडनी रॅकेट श्रीलंकेतून चालायचं आता हे रॅकेट कैरोतून चालत असल्याचं सांगण्यात येतंय.

सुरेश प्रजापतीला यापूर्वी अटक झाली होती. पण जामिनावर सुटल्यावर त्यानं पुन्हा हा धंदा सुरू केला होता. या आरोपीला अद्दल घडेल अशा कारवाईची मागणी करण्यात येतेय.

First published: October 9, 2017, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading