प्राचीन भारतात तरुणी निवडायच्या स्वत:चा प्रियकर

प्राचीन भारतात तरुणी निवडायच्या स्वत:चा प्रियकर

अगदी प्राचीन काळापासून वसंत ऋतूत स्त्रिया आपल्या प्रियकराला लाल गुलाब पाठवायच्या. अथर्ववेदात तर तरुणींना आपला प्रियकर निवडायची मुभा होती.

  • Share this:

09 फेब्रुवारी : व्हॅलेन्टाईन्स डे जवळ येतोय. सगळीकडे प्रेमाचा उत्सव सुरू झालाय. काही जण व्हॅलेन्टाईन्स डे या संकल्पनेलाच विरोध करतायत. पण त्यांना हे ठाऊक नाही की, प्रेमाचा हा उत्सव भारतीय संस्कृतीसाठी नवा नाही. अगदी प्राचीन काळापासून वसंत ऋतूत स्त्रिया आपल्या प्रियकराला लाल गुलाब पाठवायच्या. अथर्ववेदात तर तरुणींना आपला प्रियकर निवडायची मुभा होती.

युरोपमध्ये 14 फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन्स डे साजरा होतो आणि तोच काळ आपल्या इथे वसंत ऋतूचा. वसंत ऋतू म्हणजे प्रेमाचा ऋतू. प्रणयाचा आणि रोमान्सचा!

कालिदासाचा काळ हा तसा प्रेमाच्या बाबतीत पुरोगामी ठरला. कालिदासाच्या नाटकातली इरावती वसंताचं आगमन झाल्यावर राजा अग्निमित्राकडे गुलाबाची फुलं पाठवून आपलं प्रेम व्यक्त करायची.

हिंदू ग्रंथांमध्ये तरुणींना आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार  होता. लग्नाआधी दोघं एकमेकांना भेटायचे. अनेकदा एकत्रही राहत. लग्नासाठी कोणाची परवानगी आवश्यक नव्हती. वैदिक पुस्तकांप्रमाणे लिव इन रिलेशनशिपची पद्धतही होती.

अथर्ववेदात म्हटल्याप्रमाणे मुलगी वयात आली की तिचे आईवडीलच तिला आपला जोडीदार निवडायची परवानगी द्यायचे. मुलगा-मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडले तर ते एकत्र राहत. आणि नंतर समाज त्यांचं लग्न लावून देत. आजही छत्तीसगड ते उत्तर पूर्वेत आजही काही जमातीत ही प्रथा आहे.

भारतीय संस्कृतीत प्रेम हे मुक्त होतं. चौकटी मोडणारं होतं. व्हॅलेंटाईन्स डे पलिकडे जाणारं होतं.

 

First published: February 9, 2018, 5:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading