शेतात नांगरणी करणाऱ्या मर्दानी सीमाताईंची कहाणी

शेतात नांगरणी करणाऱ्या मर्दानी सीमाताईंची कहाणी

सैराट सिनेमातल्या रिल लाईफमध्ये आर्चीनं ट्रॅक्टर चालवला तर तिचं कौतुक झालं. पण सीमाताईंसारख्या अनेक रणरागीणी आपापल्या क्षेत्रात आजही पुरुषांपेक्षा सरस कामगिरी करताना दिसतायेत.

  • Share this:

प्रफुल्ल खंदारे, बुलडाणा

04 जुलै : पुरुषांची आता कुठल्याच क्षेत्रात मक्तेदारी राहिलेली नाही. बुलडाण्याच्या सीमा पाटील या शेतीच्या नांगरणीसारखी पुरुषी कामं करतात. हे मर्दानी काम करणाऱ्या सीमा पाटील यांच्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

शेतात नांगरणी करणाऱ्या या सीमाताई पाहा...शेतात नांगरणीत तशी पुरुषांची मक्तेदारी...पण बुलडाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगापूर गावातल्या सीमाताई पाटील शेतातली महिलांची कामं करतातच पण नांगरणीसारखी पुरुषी कामंही करायला त्या मागं येत नाही. वडिलोपार्जित शेतीत त्यांच्या कामाचा हुरूप एखाद्या पुरुषालाही लाजवेल असाच असतो. याशिवाय त्या राज्यात पहिल्या शंकरपट हकलणाऱ्या महिला आहेत. गावात कोणीही आजारी पडला तर प्रथमोपचारही त्याच करतात.

सीमाताईंच्या घरच्यांसाठी त्या मुलाहूनही मोठ्या आहेत. महिला म्हणून सुरुवातीला समाजात विरोध झाला पण त्याला जुमानलं नसल्याचं ते सांगतात.

सैराट सिनेमातल्या रिल लाईफमध्ये आर्चीनं ट्रॅक्टर चालवला तर तिचं कौतुक झालं. पण सीमाताईंसारख्या अनेक रणरागीणी आपापल्या क्षेत्रात आजही पुरुषांपेक्षा सरस कामगिरी करताना दिसतायेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 11:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading