S M L

भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनीच मागितली 7 कोटींची लाच, मोपलवार खंडणी प्रकरणाचा खुलासा

राधेश्याम मोपलवार यांच्यावर सतीश मांगले यानंच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सतीश मांगले यानं त्याच्याकडे अनेक पुरावे असल्याचा दावा केला होता.

Sachin Salve | Updated On: Nov 3, 2017 09:57 PM IST

भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनीच मागितली 7 कोटींची लाच, मोपलवार खंडणी प्रकरणाचा खुलासा

03 नोव्हेंबर : एमएसआरडीसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडं सात कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सतीश मांगले आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आलीये.

धक्कादायक बाब म्हणजे राधेश्याम मोपलवार यांच्यावर सतीश मांगले यानंच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सतीश मांगले यानं त्याच्याकडे अनेक पुरावे असल्याचा दावा केला होता.

त्या मोबदल्यात त्यानं मोपलवार यांच्याकडे सात कोटी रुपयांची मागणी केली होती. या सात कोटी रुपयांची मागणी करतानाचं स्टिंग ऑपरेशन आयबीएन लोकमतच्या हाती लागलंय. सतीश आणि त्याची पत्नी श्रद्धा यांच्या विरोधात मोपलवार यांनी तक्रार केल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला अटक केलीये. त्या दोघांकडून तब्बल सहा पोती कागदपत्रं आणि सीडीज जप्त करण्यात आल्यात. सतीशनं काही महिन्यांपूर्वी केलेल्या आरोपांमुळे मोपलवार यांना मुंबई त्यांच्या जबाबदारीपासून थोडं वेगळं करण्यात आलंय.

सतीश मांगलेला ज्या संभाषणामुळे अटक झाली ते संभाषण

राधेश्याम मोपलवार : खोटे आरोप मला कंटिन्यू करायचे असतील तर मला बोलायचं नाही, खोटे आरोप जर सांगणार असशील तर मनीषा अशी बोलली, तिनं असं बोललं...

Loading...
Loading...

सतीश मांगले : हे बघ, मी त्याच्याबाबत बोलतच नाही. म्हणून मी त्यांना आता सांगितलं आहे, ते फायनल करा. मला  डोक्याला ताप नको, रोज रोज भेटण्यामध्ये काही हे नाही

राधेश्याम मोपलवार : मागच्यावेळी आपण भेटलो तर आईसब्रेक झाला. आणि भेटलो 2 कोटी 40 लाखांचं एक ठरलं, वीस  वीस द्यायचे म्हणून... आता तो म्हणाला नंतर चार... नंतर म्हणाला सात... आता तो साडेसात... मला एकूण सांग तुला  अपेक्षा काय आहे? तुला द्यायचे किती आणि तू डिलिव्हर काय करणार?

 

सतीश मांगले : माझं जे आहे, माझा आकडा मी त्याला लिहून देतो

राधेश्याम मोपलवार : सांग ना राजा

सतीश मांगले : सात आजचा आकडा आहे

राधेश्याम मोपलवार : बरं!

सतीश मांगले : त्यांना मी सांगितलं की माझी एकेक गोष्ट आहे ती लिहून देतो

राधेश्याम मोपलवार : मला हे बघ, हा एक व्यवहार आहे. मी तुझा हिशोब घ्यायचा, कसं काय करायचं? कशी डिलिव्हरी,  किती दिवसांत डिलिव्हरी द्यावं अशी तुझी अपेक्षा आहे?

 

सतीश मांगले : हे बघा टायमिंग करा, परस्पर असं होत असेल तर कशाच्या भरोशावर डील करायची?

राधेश्याम मोपलवार : अरे, तुला तेवढ्यासाठी बोलावलं, म्हटलं मुझे उसे वन एंड वन बात करनी पडेगी, हे असं व्हाया व्हाया बात का प्रॉब्लेम होता है, एकदा आकडा फायनल करू, त्याची डिलिव्हरी निश्चित करू, डिलिव्हरी काय करायची ते तर  सांग मला... एक लक्षात ठेव, रोजची बदनामी, रोजची बदनामी माझी नको

सतीश मांगले : सातचा आकडा, साडेतीन द्या...बाकीचे असतील ते द्या, पुढचे कसे देणार, काय देणार, एमओयू करणार?  कसं करणार? काय करणार?

राधेश्याम मोपलवार : तू म्हणेल ते पूर्व... तू मला सांग, तुला एमओयू करायचाय... तू ड्राफ्ट कर मी सही करतो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 07:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close