पत्नीनेच केली पतीची हत्या, गुन्हा लपवण्यासाठी प्रियकराची केली प्लाॅस्टिक सर्जरी,पण...

पत्नीनेच केली पतीची हत्या, गुन्हा लपवण्यासाठी प्रियकराची केली प्लाॅस्टिक सर्जरी,पण...

तिने प्रियकराच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून हाच आपला पती असल्याचा बनाव केलाय. तेलंगणामध्ये ही धक्कादायक घटना घडलीये.

  • Share this:

11 डिसेंबर : अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढला. आरोपी महिला एवढ्यावरच थांबली नाही. तिने प्रियकराच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून हाच आपला पती असल्याचा बनाव केलाय. तेलंगणामध्ये ही धक्कादायक घटना घडलीये.

एखाद्या सिनेमात शोभावी अशी घटना तेलंगणा येथील नगरकुरनुल जिल्ह्यात घडलीये. आरोपी महिला स्वातीचं सुधाकर रेड्डीसोबत दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर दोन वर्षात खटके उडायला लागले. याच दरम्यान आरोपी महिलेचं राजेश नावाचं तरुणाशी प्रेमसंबंध सुरू झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबरच्या रात्री पती सुधाकर रेड्डी घरी झोपलेला होता. तेव्हा स्वातीने आपल्या प्रियकर राजेशच्या मदतीने डोक्यात वार करून पतीची हत्या केली. आणि त्याचा मृतदेह घराजवळील मैसन्ना जंगलात फेकून दिला.

त्यानंतर आरोपी स्वातीने प्रियकर राजेशला आपला पती असल्याचं भासवण्याचं मनाशी पक्क केलं. तीने राजेशचा चेहरा खराब करण्याचं नियोजन केलं. सुधाकरच्या हत्येनंतर दोन दिवसांनी राजेशच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकलं आणि सासरच्या मंडळींना हैदराबादरमध्ये काही अज्ञात लोकांनी सुधाकरवर हल्ला केला यात त्याचा चेहरा विद्रुप झाला असा बनाव केला. स्वाती आणि राजेशने प्लाॅस्टिक सर्जरी करण्याचा प्लॅन केला होता.

सासरच्या मंडळींनी तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि राजेशला सुधाकर समजून हैदराबादमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. यासाठी सासरच्या लोकांनी उपचारासाठी 5 लाखांचा खर्चही केला. पण, सासूला राजेशच्या वागण्यावर संशय आला. त्यांनी राजेशला जो सुधाकर बनला होता त्याला कुटुंबातील काही प्रश्न विचारली. पण त्याने काही उत्तरं दिली नाही.

त्यामुळे सासरच्या लोकांना स्वातीवर संशय बळावला. त्यांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच स्वाती आणि राजेशने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर घडलेला सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी या दोघांनीही अटक केलीये.

राजेशवर सध्या उपचार सुरू आहे. डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला पोलीस ताब्यात घेणार आहे. स्वातीच्या सांगण्यावरून सुधाकरचा जंगलात ज्या ठिकाणी मृतदेह फेकला होता तो ताब्यात घेण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 08:47 PM IST

ताज्या बातम्या