जीएसटीमुळे हाॅटेल्स होणार महाग

हॉटेल इंडस्ट्रीला नॉन एसी 12 टक्के, एसी 18 टक्के आणि लक्झरी 28 टक्के असा 3 स्तरांवर जीएसटी लागणार आहे तो सरसकट 12 टक्के करावा अशी मागणी आहारने केली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 30, 2017 12:46 PM IST

जीएसटीमुळे हाॅटेल्स होणार महाग

महेंद्र मोरे, 30 जून : जीएसटी लागू झाल्यामुळे नॉन एसी, एसी आणि लक्झरी सर्वच हॉटेल्समधील खाणापिण्याचे  दर बदलतील. जीएसटीची अंमलबजावणी करण्यासाठी आता हॉटेलमालक मेनूकार्डवर शेवटचा हात फिरवत आहेत.

दादरच्या आस्वाद हॉटेलचे मालक सूर्यकांत सरजोशी. सकाळपासूनच सरजोशी कँलक्युलेटरवर आकडेमोड करत मेनूकार्डवरील खाद्यपदार्थांचे दर बदलण्यात व्यस्त आहेत. जीएसटी लागू झाल्यामुळे आस्वादमधील खाद्यपदार्थांच्या मूळ किमतीवर 18 टक्के जीएसटी लागू होणार आहे.

जीएसटी लागू झाल्यामुळे आस्वादमधील खाद्यपदार्थांचे दर वाढतील पण हे दर वाढवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अशी प्रतिक्रिया सरजोशी यांनी दिली आहे. जीएसटी लागू करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर तसंच इतर बदल स्वीकारण्याची तयारीदेखील आस्वादमध्ये सुरू आहे.

मुंबईतील हॉटेल मालकांची संघटना आहारने देखील जीएसटीच्या दरावर नाराजी व्यक्त केलीये. हॉटेल इंडस्ट्रीला नॉन एसी 12 टक्के, एसी 18 टक्के आणि लक्झरी 28 टक्के असा 3 स्तरांवर जीएसटी लागणार आहे तो सरसकट 12 टक्के करावा अशी मागणी आहारने केली आहे.

मुंबईतील सुमारे 28 टक्के नागरिक 2 वेळचे जेवण हॉटेल्समध्ये जेवतात. त्यामुळे सरकारने हॉटेल्सना लक्झरी सेवा समजू नये असं आवाहन आहारने केलं आहे. सामान्य नागरिकांचा खिसा कापला तर सामान्य नागरिक सरकारला नक्की धडा शिकवेल असा इशाराही आहारनं दिला आहे.

Loading...

त्यामुळे नॉन एसी, एसी आणि लक्झरी यापैकी कुठल्या हॉटेलमध्ये जेवायचं हे ठरवा. खिसा तपासा आणि मगच आर्डर करा कारण एक जुलैपासून हॉटेलचं बिल भरताना तुमचा खिसा कापला जाणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...