S M L

फक्त 327 रुपये पगारवाढ मिळाली म्हणून सुरू केलं 'प्लेबाॅय',हेफनर यांची कहाणी

य. हेफनर यांनी प्लेबाॅय मासिकाची नुसती सुरुवातच केली नाहीतर अमेरिकेत आणि जगभरात सेक्शुअल क्रांती आणली. पण, प्लेबाॅय सुरू करण्यामागे जरा वेगळंच कारण होतं.

Sachin Salve | Updated On: Sep 28, 2017 05:47 PM IST

फक्त 327 रुपये पगारवाढ मिळाली म्हणून सुरू केलं 'प्लेबाॅय',हेफनर यांची कहाणी

28 सप्टेंबर : जगाला वेड लावणाऱ्या प्लेबाॅय मासिकाचे संस्थापक ह्यूज हेफनर यांनी जगाचा निरोप घेतलाय. हेफनर यांनी प्लेबाॅय मासिकाची नुसती सुरुवातच केली नाहीतर अमेरिकेत आणि जगभरात सेक्शुअल क्रांती आणली. पण, प्लेबाॅय सुरू करण्यामागे जरा वेगळंच कारण होतं.

हेफनर यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1952 मध्ये काॅपी एडिटर म्हणून केली होती. त्यावेळी फक्त 5 डाॅलर म्हणजे 327 रुपये पगारवाढ भेटली नाही म्हणून त्यांनी नोकरी सोडून दिली होती. नोकरी सोडल्यानंतर पुन्हा नोकरी करणार नाही असा निश्चय हेफनर यांनी मनाशी पक्का केला. त्यांनी बँकेकडून 600 डाॅलरचं कर्ज घेतलं आणि प्लेबाॅय मासिकाची सुरुवात केली.

मात्र, बँकेचं लोन कमी पडलं म्हणून त्यांनी 45 गुंतवणूकदार शोधून काढले. या गुंतवणूकदारातून त्यांनी 8 हजार डाॅलर जमा केले. यात एक हजार डाॅलर हे त्यांच्या आईकडून मिळाले होते. ही सगळी रक्कम प्लेबाॅय मासिकाच्या लाँचिंगसाठी जमवली होती. पण, प्लेबाॅय मासिकाचं सुरुवातीला 'स्टॅग पार्टी' हे नाव ठेवण्यात आलं होतं.



या मासिकाचा पहिला अंक हा 1953 मध्ये छापला गेला होता. पहिल्या मासिकामध्ये हाॅलिवूडची स्टार अभिनेत्री मर्लिन मुनरो हिचे 1949 मध्ये एका न्यूड कॅलेंडर शूट केलेले फोटो प्रसिद्ध केले होते. हेफनर यांच्या या पहिल्याच अंकाने एकच धुमाकूळ घातला. जवळपास 50 हजार अंक विकले गेले होते.

मासिकाची सुरुवात चांगली झाली पण एक अडल्ट मासिकाचा ठपा मात्र लागला गेला. 1963 मध्ये आॅब्सीन लिट्रेचरला प्रोत्साहन देण्याच्या आरोपावरुन हेफनर यांना अटक झाली होती.

मासिका व्यतिरिक्त त्यांनी टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 2009 मध्ये रेजी चित्रपटासाठी वर्स्ट सपोर्टिंग अभिनेता पुरस्कार मिळाला होता.  Brigitte Berman याने हेफनर यांच्या आयुष्यावर "ह्यू फेफनर:प्लेबाॅय, एक्टिविस्ट आणि रिबेल" ही डाॅक्युमेंट्री बनवली होती.

Loading...
Loading...

हेफनर यांचं व्यक्तिगत आयुष्य पाहिलं तर ते कुठल्याही कैसेनोवा पेक्षा कमी नव्हते. एकाच वेळी हेफनर सात महिलांना डेट करत होता. या व्यतिरिक्त त्यांनी ब्रांदे राॅड्रिक, इजाबेल सेंट जेम्स, टीना मॅरी, जॉर्डन होली मेडिसन, ब्रिजेट, केंड्रा विल्किन्सन यांनाही डेट केलं होतं.  एवढंच नाहीतर दोन जुळ्या बहिणींनाही त्यांनी डेट केलं होतं. हे नातं 2010 मध्ये संपुष्टात आलं. या दरम्यान 11 वर्ष वेगळं राहिल्यानंतर हेफनर यांनी आपली पत्नी कोनार्डकडून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

2012 मध्ये हेफनर यांनी आपला सर्वात लहान मुलगा कूपर हा प्लेबाॅय मासिका सांभाळणार अशी घोषणा केली होती. तेव्हापासून ते मासिकाच्या कामापासून दूर झाले होते.

American Icon and Playboy Founder, Hugh M. Hefner passed away today. He was 91. #RIPHef

A post shared by Playboy (@playboy) on

@jheneaiko was so inspired by her travels, that she turned her upcoming album #Trip, into a map. See more photos from our Sep/Oct Issue by @jenmsenn at the link in our bio. #TheMusicIssue

A post shared by Playboy (@playboy) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 05:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close