नगरमधील 'या' गावाने दुष्काळाशी केले दोन हात, मोदींनीही केलं कौतुक

नगरमधील 'या' गावाने दुष्काळाशी केले दोन हात, मोदींनीही केलं कौतुक

आज या गावाची परिस्थिती बघता खुद्द आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या गावांनी केलेल्या कामाच्या प्रेमात पडले आहेत

  • Share this:

अहमदनगर, 24 एप्रिल : भयंकर दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रात असे एक गाव आहे की जिथे पाण्याची काही कमी नाहीये. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयात हे गाव आहे. या गावाचे नाव आहे 'हिवरे बाजार' या गावाने सुद्धा एकेकाळी दुष्काळाची झळ सोसलेली होती. एक वेळ अशी होती की गावात प्यायला पाणी नसायचे हाताला काम नसायचे गावातील सर्व तरुण मोठी मंडळी कामासाठी गावसोडून शहराची वाट पकडायचे. पण आज या गावाची परिस्थिती बघता खुद्द आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी  सुद्धा या गावांनी केलेल्या कामाच्या प्रेमात पडले आहेत. असे म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी स्वतः 'मन की बात' त्यांच्या या कार्यक्रमातून या गावाचे अभिनंदन केले आणि इतर सर्व गावांना हिवरे बाजारचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलं आहे.

पण प्रश्न हा आहे की सर्व महाराष्ट्र दुष्काळात असताना या गावाला एवढे पाणी कसे काय ? याचे उत्तर दडले आहे ते त्या गावातील ग्रामस्थांच्या मेहनतीत आणि गावाचे सरपंच असलेले पोपटराव पवार यांच्या व्यवस्थापनात. १९८९ पासून या गावाने पाण्याचे व्यवस्थापन करायला सुरुवात केली होती. श्रमदानातून आणि सरकारी योजनांच्या मदतीने पाणी अडवण्याचे काम सुरू केले आणि तीनच वर्षात गाव दुष्काळमुक्त झाले. पण याही पुढे जाऊन त्यांनी पाणी वापरण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा आखला आणि पाणी वाचवण्याची जबाबदारी गावातील महिला वर्गाकडे दिली आहे.

पोपटराव पवारांच्या मते, पाणी आल्यामुळे गावात नगदी पिके, दूध डेअरी, हॉर्टिकल्चर वाढले आहे आणि गावातील व्यक्तीचे प्रति व्यक्ती उत्पन्न देखील वाढले आहे. प्रति व्यक्ती उत्पन्न ८५० होते ते आता ३० हजार रुपयापर्यंत वाढलेले आहे. त्यामुळे कामासाठी बाहेर गेलेले गावातील लोक गावात परत येत आहेत आणि आपला शेती व्यवसाय करण्यात उत्सुक आहेत. हिवरे बाजार गावात पैश्याचे नाहीतर पाण्याचे ऑडिट होते. या गावात ३५० विहारी आणि १६ बोअरवेल आहेत ज्यांना बाराही महिने मुबलक पाणी असते.

हिवरे बाजार गावाला मागच्या महिन्यात अभिनेता आमिर खानने भेट दिली आहे. आणि पाणी फाउंडेशनच्या कामात काही उपयोग होईल अशी माहिती करून घेतली आहे. एवढंच नाहीतर बऱ्याच मोठ्या मोठ्या राजकीय पक्षातील नेत्यानी सुद्धा हिवरे बाजाराला भेट देऊन पाण्याचे व्यवस्थापन जाणून घेतलं आहे.

First published: April 24, 2018, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading