'त्या' तिघींची जन्मापासूनच संघर्षाला सुरुवात !

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात एकाच वेळेस तीन मुलीला जन्म देणाऱ्या गरीब कुटुंबातल्या आईला आणि कुटुंबाला या मुलींना जगवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2017 09:10 PM IST

'त्या' तिघींची जन्मापासूनच संघर्षाला सुरुवात !

09 नोव्हेंबर : हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात एकाच वेळेस तीन मुलीला जन्म देणाऱ्या गरीब कुटुंबातल्या आईला आणि कुटुंबाला या मुलींना जगवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

'बेटी बचाव बेटी पढाव' या योजनेची सध्या शासन स्तरावर मोठी चर्चा होत आहे. मोठं मोठ्या घोषणा केल्या जात आहे. मात्र हकीगत मात्र वेगळीच आहे. आज मुलीला जन्म देण्यासाठी आणि तिच्या संगोपनासाठी संघर्षाची एक कहाणी समोर आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील कौठा रोड कृष्णा मंदिर जवळ राहणाऱ्या ऑटो चालक प्रकाश सुर्यवंशी यांच्या मुलीचे पहिले बाळंतपण. बाळंतपणासाठी पूजा माहेरी आली. उपचार सुरू झाले .सप्टेंबर महिन्यातच सातव्या महिन्यात शासकीय महिला रुग्णालयात पूजाला नेलं. मात्र तीन मुली असल्यामुळे आमच्याकडे उपचार होणार नसल्याचे सांगुन पूजाला खाजगी रुग्णालयात डॉक्टरांनी  पाठवलं. पुजाला तिळ्या आल्या. घरी आनंद साजरा करायचा की यांच्या संगोपनाच कसा करायचा याचीच कुटुंबियाला चिंता लागलीये.

पूजाच्या बाळंतपणात हजारो रुपये लागले. वडील प्रकाश सुर्यवंशी यांनी शेवटी ऑटो विकून खर्च केला. पूजाच्या बाळंतपणाच्या खर्चामुळे प्रकाश हे आर्थिक अडचणीत सापडले. आता या तीन मुलींना सांभाळण्यासाठी त्यांच्या औषधोपचारासाठी हजारो रुपये लागत आहे. जावई सुद्धा गरीब असल्याने सर्व खर्च प्रकाश सुर्यवंशी करत आहे. पण हलाखीची परिस्थिती असल्याने प्रकाश सुद्धा मेटाकुटीस आले आहे. या तीन मुलींना जगवण्यासाठी शासन आणि समाजाला मदतीची हाक देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 09:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...