न्यायाधीश होताच पाहिजे लाखोंचा हुंडा, भावी न्यायाधीशावर गुन्हा दाखल

वकील असताना फक्त मुलगी द्या...पण न्यायाधीश होताच मनात लालूच आले आणि केली लाखो रुपये,सोने, चार चाकी वाहनांची मागणी....

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2018 08:34 AM IST

न्यायाधीश होताच पाहिजे लाखोंचा हुंडा, भावी न्यायाधीशावर गुन्हा दाखल

14 मार्च : वकील असताना फक्त मुलगी द्या...पण न्यायाधीश होताच मनात लालूच आले आणि केली लाखो रुपये,सोने, चार चाकी वाहनांची मागणी....सोयरिक झाल्यानंतर लग्नासाठी १५ लाख रुपये रोख,एक इनोव्हा कार,२० तोळे सोना असा हुंडा मागितल्याचा आरोप करीत वधु पित्याने नव्याने न्यायाधिश झालेल्या वसमतच्या अॅड.शेख फय्याजोद्दीनवर गुन्हा दाखल केल्याने एकच ख़ळबळ उडाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील दर्गाह मोहल्ला परिसरात राहणाऱ्या शेख साबेर शेख इब्राहिम यांच्या मुलींची सोयरिक वसमत येथीलच रेल्वेचे सेवानिवृत कर्मचारी शेख खाजा मोइनोद्दीन यांचा मुलगा अॅड.शेख फय्याजोद्दीन यांच्या सोबत २१ सप्टेबर २०१७ रोजी मोठ्या थाटात संपन्न झाली होती. यासाठी वधु पित्याचे ३ लाख रुपये खर्च केले. या गोष्टीला सहा महिन्याच्या वर कालावधी लोटला. दरम्यान अॅड.शेख फय्याजोद्दीन हे न्यायधीशची परीक्षा पास झाल्याने लग्न करण्यास तयार होत नव्हते.

या साठी १० मार्च २०१८ रोजी वधुपित्याने अॅड.शेख फय्याजोद्दीन यांची भेट घेऊन लग्नाबाबत विचारण्यास गेले असता लग्नासाठी १५ लाख रुपये रोख,एक इनोव्हा कार,२० तोळे सोना असा हुंडा दिल्या शिवाय लग्न करणार नाही अशी मागणी केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला.

या प्रकरणी चर्चेदरम्यान वधुपित्या सोबत हुजत घालून तुम्हाला काय करायचे ते करा मी जज झालो आहे हायकोर्टात जावून केस ख़ारिज करतो अशी धमकी दिली. यामुळे सोयरिक करुनही लग्न करण्यास टाळाटाळ करीत हुंडा मागितल्याचा आरोप करीत वधू पिता शेख साबेर शेख इब्राहिम यांनी अॅड.शेख फय्याजोद्दीन आणि त्याचा भाऊ शेख अयाजोद्दीन यांच्या विरुद्ध वसमत शहर पोलीस स्थानकात हुंडा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. न्यायाधीश होण्याआधीच स्वतःच्या होणाऱ्या पत्नीबाबत जो न्याय करू शकला नाही तो न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसल्यावर जनतेला काय न्याय देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

न्यायधीशाची परीक्षा उतीर्ण होऊन पदभार स्वीकारण्या अगोदरच गुन्हा दाखल झाल्याने अॅड.शेख फय्याजोद्दीन हे चांगलेच अडचणीत सापडले आहे. अशा लालची न्यायाधीशावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 08:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close