S M L

ट्रॅक्टर विहिरीत पडणारच होतं पण..,सुरज आला धावून वाचवले 6 मजुरांचे प्राण

हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी येथे ६ मजुरांचे प्राण एका १४ वर्षाच्या मुलाने वाचवले आहे. या मुलाचं सर्वत्र कौतुक होतंय.

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2017 10:46 PM IST

ट्रॅक्टर विहिरीत पडणारच होतं पण..,सुरज आला धावून वाचवले 6 मजुरांचे प्राण

25 नोव्हेंबर : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय अनेकांना वेळोवेळी येत असतो. हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी येथे ६ मजुरांचे प्राण एका १४ वर्षाच्या  मुलाने वाचवले आहे. या मुलाचं सर्वत्र कौतुक होतंय.

हिंगोली जिल्ह्यातल्या पिंपळदरी परिसरातील एका शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. विहिरीमध्ये ६ मजूर काम करत होते. विहिरी जवळच ट्रॅक्टर उभे होते. खोदकाम होत असल्याने ट्रॅक्टर हळूहळू विहिरीच्या उताराकडे जाऊ लागलं. काही वेळातच ट्रॅक्टर विहिरीत पडले असते आणि ट्रॅक्टर खाली मजूर दबण्याची शक्यता होती.

त्याचवेळी मजुरांसोबत आलेला १४ वर्षाचा सुरज राठोड जवळ खेळत होता. ट्रॅक्टर विहिरीकडे जात असल्याचे त्याच्या निदर्शनास आले आणि सुरजणे एका क्षणाचा ही विलंब न लावता ट्रॅक्टरवर चढून ब्रेक दाबला. ट्रॅक्टर जागीच उत्तरामध्ये उभा राहिला.काही वेळाने ही बाब शेतकऱ्याने पहिली आणि त्याने सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी ही बाब सांगितली. बापुराव यांनी तात्काळ गावातील इतर ट्रॅक्टर बोलावून हा ट्रॅक्टर ओढला. जर सुरजने हिंमत केली नसती तर विहिरीत काम करणाऱ्या 6मजूरांना आपला जीव गमवावा लागला असता. देवाच्या रूपात आलेल्या सुरजच्या हिंमतीने सर्वत्र कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 10:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close