...आता दारूच्या दुकानांची गावात घुसखोरी

हायवेवर दारूबंदी झाल्यानंतर आता दारुचे गुत्ते गावात घुसू लागलेत. जुन्नरच्या नाणेकरवाडीतील दारुची दुकानं हायवेवरुन गावात आली. त्यामुळे गावातल्या महिलांनी दारुदुकानं हटावची मोहीमच उघडलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 19, 2017 07:54 PM IST

...आता दारूच्या दुकानांची गावात घुसखोरी

रोहिदास गाडगे, चाकण

19 मे : हायवेवर दारूबंदी झाल्यानंतर आता दारुचे गुत्ते गावात घुसू लागलेत. जुन्नरच्या नाणेकरवाडीतील दारुची दुकानं हायवेवरुन गावात आली. त्यामुळे गावातल्या महिलांनी दारुदुकानं हटावची मोहीमच उघडलीये.

चाकणजवळची ही नाणेकरवाडी...हायवेवर दारुबंदी केल्यानंतर हायवेलगतच्या दारुच्या दुकानांनी गावात घुसखोरी केलीये. नाणेकरवाडीत दारुबंदीचा ठराव असताना दोन दारुची दुकानं मध्यवस्तीत थाटण्यात आलीये. धक्कादायक बाब म्हणजे मंदिराच्या अगदी जवळच यातलं एक दुकान आहे. गावातल्या महिलांनी या दारुच्या दुकानांना ठाम विरोध केलाय.

गावातल्या महिलांचा तीव्र विरोध असला तरी पोलीस आणि प्रशासनाची भूमिका मात्र थोडीशी बोटचेपी वाटते.

हायवेवर दारुबंदी असल्यानं दारुची दुकानं आता लोकवस्तीकडे घुसू लागलीयेत. नाणेकरवाडीच्या महिलांनी मात्र दारुच्या दुकानांना तीव्र विरोध केलाय. नाणेकरवाडीच दारुची बाटली आडवी होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2017 07:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...