News18 Lokmat

आता बोला !, हायवेलगत दारूबंदीनंतर नागपुरात 64 टक्क्यांनी दारू विक्री वाढली

हायवेवरील दारुच्या दुकानांच्या बंदी निर्णयाबाबत. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दारुबंदीचा आदेश दिल्यानंतर नागपुरात तर दारुची विक्री 64 टक्क्यांनी वाढलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2017 11:01 PM IST

आता बोला !, हायवेलगत दारूबंदीनंतर नागपुरात 64 टक्क्यांनी दारू विक्री वाढली

 प्रवीण मुधोळकर,नागपूर

13 जून : एखादी गोष्ट करू नको म्हटलं की, त्यावर निर्बंध घातले की तीच गोष्ट प्रकर्षाने केली जाते. तसंच घडलंय हायवेवरील दारुच्या दुकानांच्या बंदी निर्णयाबाबत. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दारुबंदीचा आदेश दिल्यानंतर नागपुरात तर दारुची विक्री 64 टक्क्यांनी वाढलीये.

दारुपासून परावृत्त करण्यासाठी आणि दारू पिऊन गाडी चालवली जाऊ नये यासाठी सरकारने देशभरात हायवेपासून 500 मीटर अंतरावरील दारुची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानुसार 1 एप्रिलपासून बार आणि दारू दुकानांच्या परमिटचं नुतनीकरण करणं बंद झालं. पण या एक महिन्याच्या काळात दारुची विक्री ६५ टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती आरटीआयमध्ये उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने हायवेपासून पाचशे मिटर अंतरावरील दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर एकट्या नागपूर जिल्ह्यात ८२८ दारूची दुकाने बंद करण्यात आली. यातील अनेक दारुच्या दुकानांच्या  मालकांनी दुसरे व्यवसाय सुरू केले आहेत. तर दारुच्या विक्रीत ६५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे.

या माहितीतून मद्यशौकीनांनी मद्यप्राशनासाठी दुसरा पर्याय शोधल्याचं समोर आलंय. त्यामुळे मद्यखरेदी कमी होण्याऐवजी वाढलीये.

Loading...

राज्य सरकारनं दारुबंदी हे धोरण स्विकारलंय. संपुर्ण दारू शक्य नसली तरी नागरिकांना दारुपासून परावृत्त करण्यासाठी सरकार योजना राबवतात. पण अर्ध्यापेक्षा जास्त दारुची दुकानं बंद होऊनही मद्यशौकीनांचे मद्यप्रेम कमी झाल्याचं दिसत नाही. आणि दारू दुकानदार पळवाटा शोधून काढतांनाही पहायला मिळतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2017 11:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...