लता दीदी @90 : या कारणांमुळे लता दीदींनी केलं नाही लग्न!

''लहानपणी खूप गरिबी पाहिली. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने लग्नाचा विचार कधी आलाच नाही. लहान भावंड होती त्यांना सांभाळायचं होतं''

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2018 07:35 AM IST

लता दीदी @90 : या कारणांमुळे लता दीदींनी केलं नाही लग्न!

मुंबई, ता.24 सप्टेंबर : ''लहानपणी खूप गरिबी पाहिली. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने लग्नाचा विचार कधी आलाच नाही. लहान भावंड होती त्यांना सांभाळायचं होतं. घरात भावंडांमध्ये मोठी असल्यानं घरही चालवायचं होतं. त्यामुळं लग्नाच्या बंधनात अडकावं असं कधीच वाटलं नाही." विख्यात गायिका लता मंगशेकरांनी ही कहाणी सांगितली ती 'नूज18 लोकमत'च्या एका खास मुलाखतीत. काही वर्षांपूर्वी दिलेल्या या मुलाखतीत दीदींनी आपल्या आयुष्याचा पटच उलगडून दाखवला होता.

दीदी म्हणाल्या लहान असतानाच बाबा गेले, त्यामुळं घरची जबाबदारी सांभाळावी लागली. आशा,उषा,मीना, ह्रदयनाथ या भावंडांची माझ्यावर जबाबदारी होती. त्यामुळं लग्न करावं असं कधी वाटलच नाही. एका मुलानं लग्नाचा प्रस्तावही दिला होता, पण मी नाही म्हणाले. लग्न केलं असतं तर मला त्याच्या घरी जावं लागलं असतं आणि मग माझ्या भावंडांना कुणी सांभाळलं असतं?

आणि शेवटी म्हणजे लग्न, जन्म, मृत्यू या गोष्टी ठरलेल्या असतात असं माझं मत आहे. त्या जेव्हा व्हायच्या असतात तेव्हाच होतात. त्यावर कुणाचही नियंत्रण नसतं असं माझं मत आहे असं सांगत त्यांनी त्यांच्या तरूणपणातली कहाणीच उलगडून दाखवली.

आशा भोसले, ह्रदयनाथ मंगेशकर यांनीही याबाबत अनेकदा कृतज्ञता व्यक्त केली आहे. घरात आर्थिक तंगी असताना दीदींनी सर्व घर सावरलं आणि भावंडांचा सांभाळ केला. त्यावेळी दीदी गात होत्या आणि नाटकातही काम करत होत्या. या आर्थिक विवंचनेला त्या धाडसाने सामोरे गेल्या आणि पुढे इतिहास घडला.

'निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...',मुंबईतील गणेश विसर्जनाचे टाॅप 20 PHOTOS

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2018 07:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...