चोरीचा रि'फंडा', मोबाईल मिळालाच नाही सांगून 166 वेळा लुटलं 'अॅमेझाॅन'ला !

चोरीचा रि'फंडा', मोबाईल मिळालाच नाही सांगून 166 वेळा लुटलं 'अॅमेझाॅन'ला !

शिवम अमेझॉनवरून महागडे मोबाईल ऑर्डर करायचा. मोबाईलची डिलीव्हरी आली की थोड्याच वेळात आपल्याला मोबाईल मिळालाच नाही अशी तक्रार नोंद करून शिवम पैसे रिफंड मागायचा.

  • Share this:

महेंद्र मोरे,नवी दिल्ली

11 आॅक्टोबर : चोर चोरीसाठी अनेकानेक शक्कल लढवतात. त्यातून अनेकांना गंडवण्यात ते यशस्वीही होतात. पण कधीतरी त्याचं बिंग फुटतंच. ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना चुना लावणाऱ्या ठकसेनांचीही गोष्ट..

आघाडीच्या अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग कंपनीची अमेझिंग फसवणूक करण्यात आलीय. दिल्लीतल्या 21 वर्षीय शिवम चोप्रानं कंपनीला 50 लाखांना गंडवलंय. शिवम अमेझॉनवरून महागडे मोबाईल ऑर्डर करायचा. मोबाईलची डिलीव्हरी आली की थोड्याच वेळात आपल्याला मोबाईल मिळालाच नाही अशी तक्रार नोंद करून शिवम पैसे रिफंड मागायचा. अशाप्रकारे त्याने अँपल, सॅमसंग आणि वन प्लस कंपनीचे सुमारे 166 मोबाईल फोन अँमेझॉनवरून मागवले. त्यांचा रिफंड मिळवला आणि तेच मोबाईल बाजारात विकून दुहेरी कमाईही केली.

या कामात शिवमला सचिन जैन या मोबाईल शॉपी चालवणाऱ्या मित्रानं मदत केली. सचिन शिवमला 150 रूपयांत प्री अँक्टिवेटेड सिम कार्ड द्यायचा. सुमारे 141 सिमकार्ड वापरून शिवमनं अॅमेझॉनचे 166 मोबाईल रिफंडसहीत हातोहात लांबवले.

दिल्लीच्या विशिष्ट भागातून सतत मोबाईल रिफंडसाठी मागणी होतीय. यात काही गौडबंगाल तर नाही ना असा संशय आल्यानंतर अँमेझॉननं दिल्ली पोलिसांत धाव घेतली. दिल्ली पोलिसांनी या अमेझिंग चोरीचा छडा लावत शिवम चोप्रा आणि सचिन जैनला बेड्या ठोकल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 08:17 PM IST

ताज्या बातम्या