S M L

कुलभूषण जाधव प्रकरणाची 1 रुपया फी घेणारे हरीश साळवे यांच्याबद्दल...

कुलभूषणसाठी एक रूपया घेतला म्हणून सगळ्यांसाठी हीच फी हरीश साळवे घेत असतील असा गैरसमज करून घेऊ नका.

Sachin Salve | Updated On: May 18, 2017 11:44 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणाची 1 रुपया फी घेणारे हरीश साळवे यांच्याबद्दल...

18 मे : देशाच्या न्यायव्यवस्थेत मराठी नावं फार कमी दिसतात. टॉपच्या वकिलांमध्ये तर विरळच. पण हरीश साळवे हे नाव सगळी कसरत भरून काढतं.

हरीश साळवे म्हटलं की ,अगोदर एनकेपी साळवेंचं नाव बहुतांश जणांना आठवतं. एनकेपी साळवे हे काँग्रेसचे मोठे नेते होते आणि स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते. आता बीसीसीआयमुळे ज्या पवारांचा सगळीकडे गवगवा असतो, त्याचे एनकेपी साळवेही अध्यक्ष होते. एनकेपी साळवे हे राजकीय नेते होते तर त्यांचा मुलगा हरीश साळवे हे नामवंत वकिल म्हणून आज ओळखले जातात. ते फक्त सुप्रीम कोर्टातच नाही तर वेगवेगळ्या केसेसमध्ये हायकोर्टापासून ते आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत सगळ्या ठिकाणी बाजू मांडत असतात.

एखादा वकिल किती यशस्वी आहे हे दोन गोष्टींवरून ओळखलं जातं. एक तो केसेस किती जिंकतो आणि दुसरं तो केस लढायला पैसे किती घेतो. हरीश साळवेंनी कुलभूषण जाधवची केस लढवायला केंद्र सरकारकडून दमदार वसुली केल्याची जोरदार चर्चा ट्विटरवर रंगली. पण जाधवच्या केससाठी हरीश साळवेंनी फक्त 1 रूपया फी घेतल्याचं खुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजना स्पष्ट करावं लागलं.



कुलभूषणसाठी एक रूपया घेतला म्हणून सगळ्यांसाठी हीच फी हरीश साळवे घेत असतील असा गैरसमज करून घेऊ नका. देशप्रेम दाखवण्यासाठी हरीश साळवेंनी 1 रूपया घेतलाय. इतर वेळेस ते फक्त बड्या केसेसच घेतात आणि त्यात ते प्रत्येक तासाला काही लाख तर एका दिवसासासाठी पंचवीस ते 30 लाख रूपये घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांच्या फीवरून कळून जाईल की साळवे हे किती मौल्यवान वकिल आहेत.

आता थोडसं हरीश साळवेंनी लढवलेल्या केसेस बघा. देशातल्या बड्या उद्योगपतींपासून ते अनेक राजकीय कांडांपर्यंत साळवेंनी केसेस लढवलेल्या आहेत. त्यात व्होडाफोनच्या टॅक्स केसपासून ते टाटांसाठी ते कोर्टात उभे राहिले. भारताचे सॉलीसीटर जनरल म्हणूनही हरीश साळवेंनी काम पाहिलंय. नागपूरमध्ये त्यांचं घर आहे. धुळ्याशीही त्यांचा संबंध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2017 05:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close