स्पेशल रिपोर्ट : जीएसटीमुळे वाईन होणार 'आंबट' !

स्पेशल रिपोर्ट : जीएसटीमुळे वाईन होणार 'आंबट' !

सध्या भरावा लागणारा व्हॅट आणि सेवा कर यात 4 टक्के सरकार परत देतं..पण आता जीएसटी लागू झाल्यानंतर ही सवलत बंद होणार असल्यानं वाईनच्या किमती आणखी वाढणार हे नक्की.

  • Share this:

प्रशांत बाग, नाशिक

29 जून : जीएसटी लागू होण्याची वेळ जशी जवळ येतेय. तसतशी जीएसटीमुळे होणाऱ्या फायदा-नुकसानीची धास्ती अनेक उद्योगांनी घेतलीये. काहींनी तर थेट कोर्टात धाव घेऊन जीएसटी कसा लांबवता येईल हे प्रयत्नही सुरू केले. पण याच जीएसटीतून वगळल्यानं देशातील वाईन उद्योग मात्र संकटात सापडलाय.

वाईन... द्राक्षापासून तयार केलं गेलेलं हे पेय..परदेशात वाईन फारंच लोकप्रिय असली तरी आपल्या देशात मात्र वाईनला फारशी मान्यता नाही आणि म्हणूनचं महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यापुरता हा व्यवसाय आता मर्यादित राहिला आहे. तसं पाहिलं तर युवा वर्गासह कौटुंबिक पेय म्हणून वाईन झपाट्यानं लोकप्रिय झाली आहे. पण एकीकडे हायवेच्या 500 मीटर अंतरापर्यंत मद्यविक्री बंद करण्याचा कोर्टाचा निर्णय तर दुसरीकडे सरकारच्या करप्रणालीचा फटका या वाढत्या उद्योगाला अडचणीत आणणारा ठरलाय.

देशाची वाईन इंडस्ट्री आहे 700 कोटींची..यात एकट्या सुलाचा शेअर आहे 65 टक्के...दरम्यान सध्या भरावा लागणारा व्हॅट आणि सेवा कर यात 4 टक्के सरकार परत देतं..पण आता जीएसटी लागू झाल्यानंतर ही सवलत बंद होणार असल्यानं वाईनच्या किमती आणखी वाढणार हे नक्की.

वाईन उद्योगाला फटका?

-  वायनरीजला लागू होणार दुहेरी करप्रणाली

-  कच्च्या मालाच्या खरेदीवर द्यावा लागणार GST

- विक्रीवर भरावा लागणार व्हॅट आणि सेवा कर

- सध्या कच्च्या मालावर व्हॅट आणी सेवा कर लागू

-  विक्रीनंतर 4 टक्के परतावा मिळायचा

- GST लागू झाल्यानंतर परतावा बंद होणार

- GST आणि सध्याच्या करात 1 जुलैनंतर 5.50 टक्के फरक

- पर्यायानं वाईन 5.50% टक्क्यांनी महागणार

वाईनला लिकर कॅटगिरीत ठेवण्याचा फटका वाईन इंडस्ट्रीला बसू शकतो. लिकरमध्ये समावेश आणि जीएसटीमधून बाहेर अशा दुहेरी कात्रीत वाईन उद्योग सापडलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 12:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading