गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मोठा खुलासा, हल्लेखोर 2 नव्हे तर 4 होते ?

गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मोठा खुलासा, हल्लेखोर 2 नव्हे तर 4 होते ?

पानसरेंवर हल्ला करणारे दोघं नव्हे तर चौघं असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय. या दाव्यामुळे समीर गायकवाडच्या जामिनावर कोर्ट काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

  • Share this:

 संदीप राजगोळकर,कोल्हापूर

16 जून : कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झालाय. पानसरेंवर हल्ला करणारे दोघं नव्हे तर चौघं असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय. या दाव्यामुळे समीर गायकवाडच्या जामिनावर कोर्ट काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड आणखी अडकलाय. समीर गायकवाडला कॉम्रेड पानसरेंवर गोळ्या झाडताना पाहिल्याचं सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी कोर्टात सांगितलंय. समीरला पाहणारा चौदा वर्षांचा मुलगा असून क्लासला जात असताना त्यानं पानसरे दाम्पत्यावर गोळ्या झाडताना पाहिल्याचं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे.

आतापर्यंत पानसरे दाम्पत्यावर हल्ला झाला त्यावेळी दोन जण घटनास्थळी उपस्थित असल्याची थिअरी सांगितली जात होती. पण आता त्यामध्ये नवीन माहिती समोर आलीये. हत्या झाली त्यावेळी घटनास्थळी चार जण दोन बाईकवर होते अशी माहिती कोर्टाला देण्यात आलीये.

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गींच्या हत्यांसाठी 2 समान पिस्तुलांचा वापर झाल्याचा सरकारी पक्षाचं म्हणणं आहे. या हत्येतले संशयित सारंग अकोलकर आणि विनय पवार फरार आहेत. समीरला जामीन मिळाल्यास तोही फरार होईल. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकारी पक्षानं केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2017 06:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading