शेतकरी रांगेत,उद्योगपतींना मात्र बँकांकडून 81 हजार कोटींची कर्जमाफी !

शेतकरी रांगेत,उद्योगपतींना मात्र बँकांकडून 81 हजार कोटींची कर्जमाफी !

गेल्या 5 वर्षात 2 लाख 46 हजार कोटी रूपयांची कर्ज माफ 2016 मध्ये 57 हजार 586 कोटी रुपये माफ 2015 मध्ये 49 हजार 018 कोटी रुपये माफ

  • Share this:

रफिक मुल्ला, मुंबई

18 आॅगस्ट : विजय मल्ल्याचं कर्ज प्रकरणाचा वाद ताजा असतानाच चालू वर्षीही सरकारी बँकांनी उद्योगपतींचे जवळपास 81 हजार 624 कोटी रूपये माफ केलंय. एकीकडे शेतकरी कर्जासाठी सरकार अटींवर अटी लादत असताना उद्योगपतींवर केलेली खैरात वादग्रस्त ठरतंय.

एक हप्ता चुकला तरी सामान्य कर्जदारांना छळणाऱ्या बँका काही उद्योपतींवर मात्र मेहरबान आहेत. देशातल्या 27 राष्ट्रीयकृत बँकांनी उद्योगपतींना दिलेली 81 हजार 624 कोटींची बुडीत कर्ज माफ करण्यात आली आहेत. या थकीत कर्जांमुळे काही बँकांचा तोटा वाढलाय. तर काही बँका डबघाईला आल्यात. त्यातून बाहेर काढण्यासाठी खास मार्ग काढले जात आहेत.

उद्योगपतींवर बँका मेहेरबान

गेल्या 5 वर्षात 2 लाख 46 हजार कोटी रूपयांची कर्ज माफ

2016 मध्ये 57 हजार 586 कोटी रुपये माफ

2015 मध्ये 49 हजार 018 कोटी रुपये माफ

बँकांनी विजय मल्ल्याला जसे 9000 कोटीचे कर्ज दिले आणि तारण मात्र बुडीत कंपनी करून घेतली. तसाच प्रकार इतर उद्योगपतींच्या बाबतीत घडलाय. उद्योगपतीधार्जिण्या कारभारामुळे बँकांची आर्थिक स्थिती मात्र आता फार नाजूक झाली आहे.

First published: August 18, 2017, 10:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading