पेपर टाकणारा ते भूमाफिया..!, अशी आहे सुनील शितपची कुंडली

पेपर टाकणारा ते भूमाफिया..!, अशी आहे सुनील शितपची कुंडली

घाटकोपरमध्ये इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सुनील शितपला अखेर अटक झालीये. या सुनील सितपची कुंडली आयबीएन लोकमतच्या हाती लागलीये.

  • Share this:

26 जुलै : घाटकोपरमध्ये इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सुनील शितपला अखेर अटक झालीये. या सुनील सितपची कुंडली आयबीएन लोकमतच्या हाती लागलीये. पेपर टाकणारा सुनील भूमाफिया कसा झाला याचा हा लेखाजोखा...

सुनील शितप सुरुवातीला घरोघरी पेपर टाकत होता. त्याच दरम्यान त्यानं छोट्यामोठ्या नोकऱ्या केल्या. मात्र नोकऱ्यांमध्ये मन रमत नव्हतं. नंतर शितपनं केबल ऑपरेटर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. कमी कालावधीतच सुनील शितप केबल ऑपरेटरच्या निमित्तानं लोकांच्या परिचित झाला आणि दररोज मिळणाऱ्या रोख रकमेतून त्यानं घाटकोपर, विक्रोळी आणि पवई परिसराता अनधिकृत बांधकामांचे इमले बांधण्यास सुरुवात केली.

घाटकोपर परिसरात कोणतीही मोकळी जागा अथवा भूखंड दिसल्यावर तो तिथं रेडिमेड बांधकाम साहित्य  रातोरात ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मोकळ्या जागेवर अनधिकृत शेड किंवा घरं बांधलेली दिसायची. याकामी त्यानं महापालिकेच्या इंजिनीअरपासून ते असिस्टंट कमिशनरपर्यंत तर पोलीस खात्यात कॉन्स्टेबलपासून सीनियर पीआयपर्यंत सर्वांशी जवळीक वाढवली. लोकांना मदत करणे आणि तीसुद्धा रोख स्वरूपात करत  असल्यानं काही वर्षांतच सुनील शितप हा तिथला दानशूर व्यक्ती म्हणूनही प्रसिद्धीस आला.

दरम्यानच्या काळात त्यानं राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेशी संबंधित पदाधिकाऱ्यांशी जवळीक साधून आपली कामं करून घेऊ लागला. शिवसेनेच्या 'शिवसहकार'चा तो पदाधिकारी बनला आणि  रायगडमधून तो विधानसभेसाठी इच्छुक बनला. मात्र त्याची डाळ विधानसभेच्या तिकिटासाठी न शिजल्यानं  त्यानं महापालिका निवडणुकीत घाटकोपरच्या वॉर्ड क्र.126 मधून पत्नी स्वातीला उभं केलं. मात्र स्वाती शितप  यांचा पराभव मनसेच्या अर्चना भालेराव यांनी केला.

शिवसेनेच्या कोणत्याही पदावर नसतानाही विभागप्रमुख राजेंद्र राऊतसह सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या वर्तुळात त्याची ऊठबस वाढली. घाटकोपर, विक्रोळी आणि पवई या परसिरात 25हून अधिक निवासी, व्यावसायिक अशी बांधकामं उभारली. पवई लेक समोरील प्रसिद्ध अशा RUDE LONGE हे हॉटेलही अशाच पद्धतीनं मोकळ्या  जागेत उभं केलं आहे. तसंच एप्रिल 2017 मध्ये घाटकोपरच्याच साईनाथ नगर इथं 5 हजार स्क्वेअर फुटाचं  रेडिमेड बांधकाम त्यानं केलं, मात्र त्याचे एन वॉर्डचे असिस्टंट कमिशनर एस.एम. द्विवेदी.

या अनधिकृत बांधकामावरून महापालिकेनं त्यांना निलंबित केलं, पण शितपचं कुणीही काहीही करू शकला नाही. सिद्धी साई  अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील 5 निवासी गाळ्यांपैकी 3 निवासी गाळे शितपनं खरेदी केले आणि त्याच गाळ्यांमध्ये त्याला नर्सिंग होम सुरू करायचं होतं, त्यासाठी त्यानं तळमजल्यावरील रोड बेरिंग पिलर कापण्यास घेतल्याचा शितपवर आरोप आहे.

17 जणांचे बळी घेणाऱ्या शितपला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात  आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2017 08:41 PM IST

ताज्या बातम्या