व्यवसाय ठप्प, मुलांची शाळाही सुटली ; गोरक्षकांच्या हल्ल्यांची अशीही दहशत

. सध्या त्यांनी वाहतूकच बंद केलीय. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय. पैसा नाही म्हणून मुलांची शाळा सुटली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2017 06:21 PM IST

व्यवसाय ठप्प, मुलांची शाळाही सुटली ; गोरक्षकांच्या हल्ल्यांची अशीही दहशत

हलीमा कुरेशी, पुणे

08 एप्रिल : देशभरात जनावरांची वाहतूक करणाऱ्या मुस्लिम वाहतुकदारांवर गोरक्षकांचे हल्ले वाढले आहेत. राजस्थानातील अलवर इथं पेहलू खान यांच्यावर गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय. गोहत्या केल्यास गुजरातमध्ये जन्मठेपेची तरतूद केलीय. पण या सगळ्याचा महाराष्ट्रातील कुरेशी समाजावर काय परिणाम होतोय याविषयीचा हा रिपोर्ट...

कुरेशी मोहल्ल्यातील अयुब कुरेशी यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अधिकृतपणे जनावरं, त्यातही म्हशींची वाहतूक करताना त्यांच्यावर अनेकदा हल्ले झालेत. सध्या त्यांनी वाहतूकच बंद केलीय. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय. पैसा नाही म्हणून मुलांची शाळा सुटली. गोरक्षकांच्या हल्ल्यांच्या भीतीने समाज भीतीच्या सावटाखाली आहे.

गोरक्षकांचे हल्ले वाढल्याने जीवाच्या भीतीने ग्राहकांनी मटण मार्केटमध्ये जाणंच बंद केलंय. त्यामुळे जीवाची भीती आणि त्यात ठप्प पडत चाललेला व्यवसाय अशा दुहेरी कात्रीत विक्रेता सापडलाय.

गोवंशहत्याबंदीनंतर अल कुरेशी संघटना कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने राज्यसरकारला या विषयी 10 दिवसांत भूमिका मांडायला सांगितलंय. पण व्यापरी गोवंशहत्या करत नाही याबाबतचे सगळे पुरावे त्यांच्याकडे असुनही पोलीस त्यांनाच दोषी ठरवतं.

Loading...

जिथे कायद्याचं पालन झालेलं नाही त्यांना शासन करणं पोलिसांचं, न्यायव्यवस्थेचं काम. पण गोरक्षक मात्र कायदा हातात घेऊन हल्ले करत असतील तर तेही चूकच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...