नागपुरातल्या संस्थेचा पुढाकार,अंत्यसंस्कारासाठी दिला लाकडाला पर्याय

नागपूरच्या इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशन दहनघाटांवर पर्यावरणपुरक अंत्यसंस्कार करण्याचे महत्व नागरिकांना पटवून दिले आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2017 09:40 PM IST

नागपुरातल्या संस्थेचा पुढाकार,अंत्यसंस्कारासाठी दिला लाकडाला पर्याय

05 सप्टेंबर : नागपूरच्या इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशन दहनघाटांवर पर्यावरणपुरक अंत्यसंस्कार करण्याचे महत्व नागरिकांना पटवून दिले आहे. लाकडांना पर्याय म्हणून आता गोवऱ्यांचा आणि मोक्ष काष्ठचा वापर अंत्यसंस्कारासाठी अनेक दहन घाटांवर सुरुवात करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त आयबीएन -लोकमतच्या गणेशनिधी या विशेष सदरात पाहुयात यासंदर्भात विशेष वृतांत...

देशभरात दरवर्षी कोट्यवधी झाडांची अंत्यसंस्कारासाठी कत्तल केली जाते. झाडांना वाचवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या आणि शेतीतील कचऱ्यातून तयार केलेल्या मोक्ष काष्ठच्या वापरातून पर्यावरणपुरक अंत्यसंस्कार केले जाऊ शकते हे नागपूरच्या इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनने लोकांना पटवून दिले आहे.

या पर्यावरण पुरक अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या मोक्ष काष्ठ साठी शेतकऱ्यांच्या शेतातील पराटी, तुराटी विकत घेतल्या जातात त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी १५०० रुपये नफाही मिळतो.

नागपूर महानगर पालिकेच्या अंबाझरी घाटावर दरवर्षी २५०० ज्या जवळपास अंत्यसंस्कार करण्यात येतात त्यापैकी तब्बल आठशे अंत्यसंस्कार पर्यावरण पुरक पद्धतीने करण्यात येतात.

तुम्हाला या संस्थेला मदत करायची असेल तर संपर्क करू शकता

Loading...

 

Eco friendly living foundation

खातेक्रमांक - 33547535893

बँकेचे नाव  State bank of India

IFSC code:SBIN0007504

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 09:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...