अखेर ललिता झाली ललित !

अखेर ललिता झाली ललित !

मी आता पूर्णपणे पुरूष असल्याचं जाणवतोय. थोडा आराम करून मी लवकरच ड्युटीवर हजर होणार आहे. मी खूप खुश आहे. माझी नेम प्लेट आता ललिता साळवे होऊन ललित साळवे होईल,

  • Share this:

अमन सय्यद, मुंबई

12 जून : बीड येथील 29 वर्षीय महिला काॅन्स्टेबल ललिता साळवेला ललित बनण्यासाठी सेक्स चेंज शस्त्रक्रिया यशस्वी झालीये. त्यामुळे आज ललितला हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय.

मुंबईत सेंट जाॅर्ज रुग्णालयात ललितावर मागील महिन्यात आॅपरेशन झालं होतं. सहा डाॅक्टरांच्या टीमने ललितवर जेनिटल रिकंस्ट्रक्शन सर्जरी केली. जवळपास ही चार तास सर्जरी सुरू होती. ही पहिली अशी सर्जरी आहे जी यशस्वी झाली. ललितला काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्याला सुट्टी देण्यात आली.

न्यूज18 सोबत बोलताना ललितने सांगितलं की, या दिवसाची मी गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. कोर्टापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत मदत मागितली. अखेर आज मी माझ्या लढ्यात यशस्वी झालोय. मीडियाने दिलेला भक्कम पाठिंबा हा माझ्यासाठी मौलाचा आहे असं ललितने आवर्जून सांगितलं.  माझं कुटुंब, मित्रांनी चांगली साथ दिली आणि मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझी मदत केली त्याबद्दल ललितने आभार व्यक्त केले.  

मी आता पूर्णपणे पुरूष असल्याचं जाणवतोय. थोडा आराम करून मी लवकरच ड्युटीवर हजर होणार आहे. मी खूप खुश आहे. माझी नेम प्लेट आता ललिता साळवे होऊन ललित साळवे होईल, मला ड्युटीवर जाईन होऊन वरिष्ठांना कडक सॅल्युट करायचाय अशी इच्छा ललितने बोलून दाखवली.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ललितने सर्जरीसाठी सुट्टी मागितली होती तेव्हा वरिष्ठांनी सुट्टी देण्यास नकार दिला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की ललितला कोर्टात धाव घ्यावी लागली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत अधिकाऱ्यांना ललितची मदत करण्याचे आदेश दिले.

ललितवर केलेली सर्जरी यशस्वी राहिली. त्याला वेगळी ओळख देण्यात आम्ही यशस्वी झालो. ललितच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार आणि काही सेवाभावी संस्थांनी उचलला. सर्जरीसाठी ललितकडे पैसेही नव्हते. जर खासगी रुग्णालयात अशी सर्जरी केली तर 1-1.5 लाख खर्च येतोय अशी माहिती सेंट जाॅर्ज रुग्णालयाचे डाॅक्टर मधुकर गायकवाड यांनी दिली.

ललिता आता ललित झाला असून त्याला तब्येतीसाठी काही दिवस आराम करावा लागेल त्यानंतर तो ड्युटी जाॅईन करू शकतो अशी माहितीही गायकवाड यांनी दिली. त्याच्यावर झालेली सर्जरीही या रुग्णालयातली पहिली सर्जरी आहे. यानंतर आम्हाला अनेक लोकांचे यासाठी काॅल आले. आता ललितच्या शरिरात महिलाचा कोणताही अंश नसून आता त्याच्या अंगात पुरुषाचे हाॅर्मोंस आहे अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.

ललितला पुरुष करण्यासाठी सहा महिन्यानंतर आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दाढी आणि मिशा ट्रांसप्लांट करण्यात येणार आहे. जेणे करून तो पूर्णपणे पुरूषासारखा दिसेल.

विशेष म्हणजे, ललिता साळवेचा जन्मताच लिंग अविकसित होता. त्यामुळे घरच्यांना ती मुलगी वाटली आणि तिचा सांभाळ हा मुलीप्रमाणे झाला. वयाच्या सातव्या वर्षी ललिताच्या टेस्टिकल (अंडकोश) ला ट्यूमर समजून एका डॉक्टरने सर्जरी करून तो काढून टाकला होता. पण ललिताला पुरुषासारखं जगायचं होतं. अखेर मोठ्या संघर्षानंतर त्याची ही इच्छा आता पूर्ण झालीये.

First published: June 12, 2018, 11:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading