S M L
Football World Cup 2018

नेहरू-गांधी घराण्यासह इतर नेतेही राहिले काँग्रेसचे अध्यक्ष !

नेहरू-गांधी घराण्यातील पाचवी पिढी राहुल गांधी यांच्या रुपाने काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झालीये

Sachin Salve | Updated On: Dec 11, 2017 06:28 PM IST

नेहरू-गांधी घराण्यासह इतर नेतेही राहिले काँग्रेसचे अध्यक्ष !

11 डिसेंबर : नेहरू-गांधी घराण्यातील पाचवी पिढी राहुल गांधी यांच्या रुपाने काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झालीये. 132 वर्ष जुन्या काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावर राष्ट्रपिता महात्मा गांधींपासून ते हिंदू महासभाचे मोठे नेते राहिले आहे. परदेशातील लोकांपासून ते देशातील सगळ्या कानाकोपऱ्यातील लोकांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळलीये. ज्या नेत्याने अध्यक्षपदाची धुरा सांभाळली यामध्ये चार महिला आणि तीन नेत्यांची हत्या झाली आहे.

भारतातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षात आतापर्यंत प्रत्येक अध्यक्षांनी इतिहासाच्या पानात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. 47 वर्षीय राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात 19 वर्षांनंतर बदल झाले आहे.

1985 मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. भारताला स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत काँग्रेस पक्षात 15 नेत्यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली. यापैकी 4 जण हे नेहरू-गांधी घराण्याशी संबंधीत आहे. राहुल गांधी हे गांधी घराण्यातील पाचवे व्यक्ती आहे जे अध्यक्ष झाले आहे.

1927 पासून ते भारताला स्वांतत्र्य मिळेपर्यंत 38 वर्ष नेहरू-गांधी घराण्याचं नेतृत्व राहिलं आहे. जवाहरलाल नेहरू यांनी 3 वर्षं, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी प्रत्येकी 8-8 वर्ष अध्यक्ष राहिले आहे. तर सोनिया गांधींनी सर्वाधिक 19 वर्ष काँग्रेसचे अध्यक्षपद भुषवले आहे.

स्वातंत्र्यापूर्वी राहुल गांधींचे खापरपंजोबा मोतीलाल नेहरू पक्षाचे अध्यक्ष राहिले होते. मोतीलाल नेहरू हे काँग्रेस अध्यक्ष म्हणून या घराण्यातून पहिले व्यक्ती होते.

महात्मा गांधी, सरदार वल्लभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, अबुल कलाम आजाद आणि सरोजिनी नायडू या दिग्गजांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले होते.

डिसेंबर 1885 मध्ये काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात पत्रकार आणि बॅरिस्टर वोमेश चंद्र बोनर्जी यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तर दादा भाई नौरोजी हे काँग्रेसचे अध्यक्ष होणारे दुसरे व्यक्ती ठरले होते.

सोनिया गांधी परदेशातील असल्यामुळे अनेकांनी सवाल उपस्थितीत केले होते पण त्यांच्या आधी 5 अशा व्यक्ती होत्या जा काँग्रेसच्या अध्यक्षापदाची धुरा सांभाळली होती आणि त्यांचा जन्म भारताबाहेर झाला होता.

(साभार -हिंदी फर्स्टपोस्ट काॅम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close