• Home
  • »
  • News
  • »
  • special-story
  • »
  • टाईमपास म्हणून सुरू केलेलं युट्युब चॅनेल आहे 72 हजारांवर लोकांची पसंती

टाईमपास म्हणून सुरू केलेलं युट्युब चॅनेल आहे 72 हजारांवर लोकांची पसंती

दिल्लीच्या रिचा गुप्ता आज यु ट्युबवरचं फूड चॅनल चालवते. त्याचं नावं आहे Healthy Kadai. आणि 72 हजारांपेक्षा जास्त तिचे फाॅलोअर्स आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 24 जून : लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती म्हणून रिचानं 3 वर्षे बीडीएसचं शिक्षण घेतलं.  नंतर एमबीबीएसची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण नाही झाली  म्हणून टेक्सटाइलचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर आणि त्याआधी 4-5 वर्षे नोकरीही केली.दिल्लीच्या रिचा गुप्ता आज यु ट्युबवरचं फूड चॅनल चालवते. त्याचं नावं आहे Healthy Kadai.  आणि 72 हजारांपेक्षा जास्त तिचे फाॅलोअर्स आहेत. हेही वाचा पंढरपुरात शिक्षणाचा खर्च वडिलांना झेपत नसल्यानं मुलीनं संपवलं आयुष्य छोट्या ठेल्यावर सुरुवात करत 'त्या' आज आहेत 14 रेस्टाॅरंट्सच्या मालकीण! हिंगोलीमध्ये स्त्रीरोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही, बाळंतिणी झोपल्या रस्त्यावर रिचा सांगते, 'मला जेवण बनवण्याची अजिबात आवड नव्हती. मी मोठ्या शहरात राहणारी, 9 ते 5 नोकरी करणारी सामान्य मुलगी होती. मात्र बाळ झाल्यानंतर नोकरी सोडावी लागली आणि सगळा वेळ बाळाच्या देखभालीत आणि कुटुंबासाठी जात असे. नेहमी नोकरी करणाऱ्या महिलेसाठी सरळ गृहिणी बनून घरी राहणे कठीण जाते. घरी बसून वैताग येत असे. कधी कधी वाटे की मी सर्वांसाठी काही ना काही करत आहे पण स्वत:लाच वेळ देऊ शकत नाहीये. म्हणून मी पुन्हा एका ऑनलाइन मीडिया कंपनीत काम करायला सुरुवात केली. वेळ मिळेल तेव्हा मी  सासूकडून काही पदार्थ बनवायला शिकले. एकदा माझे पती पाठीमागून माझा व्हिडीओ बनवताय याची मला कल्पना नव्हती. आणि त्यांनी मला न सांगताच व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला आणि त्याला हजार व्यूज मिळाले.' रिचा गुप्ताला एक नवा आयाम मिळाला. यु ट्युब चॅनलसाठी कॅमेरा, लाईटस्, एडिटिंग कसं करायचं हे रिचाच्या नवऱ्यानं शिकवलं. तरीही मनासारखी क्वालिटी मिळत नव्हती. दरम्यान, रिचाला  YouTube Next Up 2016 हा अॅवाॅर्डही मिळाला. आणि यु ट्युबकडूनच तिला ट्रेनिंग मिळालं. व्हिडिओ क्वालिटी सुधारली. रिचा तिच्या या Healthy Kadaiसाठी वेगवेगळ्या रेसिपीज दाखवते. अनेक प्रयोग करते. ते प्रेक्षकांना आवडतं. युट्युब कसं बनलं पैसे कमवण्याचं माध्यम? रिचा म्हणते, "युट्युबवर दोन प्रकारे पैसे कमवता येतात. एक मॉनेटायजेशनच्या अॅडने आणि दुसरे ब्रँड स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून. माझ्यासाठी पैसे कमवणं नाही तर खाद्यपदार्थ बनवणे जास्त मोठी गोष्ट आहे. कुकिंगमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह करणं मला नेहमीच आवडतं."
First published: