महाराष्ट्रात 'नकोशीच', 2016 मध्ये 1000 मुलांमागे फक्त 899 मुली !

महाराष्ट्रात 'नकोशीच', 2016 मध्ये 1000 मुलांमागे फक्त 899 मुली !

2016 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी राज्यात 1000 मुलांमागं मुलींची संख्या अवघी 899 असल्याचं समोर आलंय. 2015 मध्ये हीच संख्या 1000 मुलांमागे 907 अशी होती

  • Share this:

 प्राजक्ता पोळ-शिंदे,मुंबई

04 आॅगस्ट : गेल्या दोन वर्षांपासून मुलींच्या जन्माच्या प्रमाणात सातत्याने घट झालेली पाहायला मिळते. २०१७ मध्ये पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत ५७२ केसेस दाखल झालेल्या आहेत. सर्व कायदे असून सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाहीये. यासंदर्भातला हा रिपोर्ट

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी "बेटी बचाव बेटी पढाव, लेक वाचवा" अशा सरकारी मोहिमा सुरू आहेत. पण या मोहिमांचा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात स्त्री पुरुष प्रमाण पाहिलं असता मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या रोडावलीये.

2016 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी राज्यात 1000 मुलांमागं मुलींची संख्या अवघी 899 असल्याचं समोर आलंय. 2015 मध्ये हीच संख्या 1000 मुलांमागे 907 अशी होती. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारनं कायदा केला. बेकायदा गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांवर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत 572 खटले दाखल करण्यात आले. यातल्या 102 डॉक्टरांना शिक्षा ठोठावण्यात आलीये. यातल्या 85 डॉक्टरांना सश्रम कारावास आणि 17 डॉक्टरांना दंड ठोठावण्यात आलाय.

कठोर कायदे केले तरी समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं असल्याचं महिला लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे.

देशातल्या अनेक सामाजिक सुधारणांची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात झाली. महिलांना अग्रणी ठेवणाऱ्या आणि मानसन्मान असलेल्या महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण विषम होणं ही बाब अधिक चिंताजनक समजली जातेय.

महाराष्ट्रात 'नकोशीच'

 2016 मध्ये 1000 मुलांमागे 899 मुली  

2015मध्ये 1000 मुलांमागे 907 मुली

बेकायदा गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांवर 572 खटले

102 डॉक्टरांना शिक्षा ठोठावण्यात आली

85 डॉक्टरांना सश्रम कारावास 17 डॉक्टरांना दंड

First published: August 4, 2017, 10:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading