S M L

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाही फाॅर्म !

नागपुरातल्या शेतकऱ्यांना आजही फॉर्म मिळाले नाही. किंवा ग्रामपंचायत पातळीवर फॉर्म भरुन घेण्यासाठी कोणतंही केंद्र सुरू झालेलं नाही.

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2017 09:19 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाही फाॅर्म !

 प्रवीण मुधोळकर,नागपूर

25 जुलै : शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकार आजपासून ऑनलाईन फॉर्म भरुन घेणार होतं. पण वस्तूस्थिती तशी नाहीये. नागपुरातल्या शेतकऱ्यांना आजही फॉर्म मिळाले नाही. किंवा ग्रामपंचायत पातळीवर फॉर्म भरुन घेण्यासाठी कोणतंही केंद्र सुरू झालेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा राज्य सरकारने केली खरी पण रोज नवनवीन बदलामुळे कर्जमाफीचा निर्णय वादात अडकलाय. अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून दुर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून अटी शर्थींचा फाॅर्म भरून घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पण त्याचेही फार्म शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाहीत.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर मधील संत्राउत्पादक शेतकरी असलेले वसंत भोयर गेल्या दोन महिन्यापासून कर्जमाफीच्या आशेन बँकेच्या चकरा मारताहेत. भोयर यांना कर्जदार शेतकऱ्यांच्या यादीशिवाय काहीही अद्याप मिळाले नाही. आता सरकारने अटी शर्थींचा फार्म भरून घेण्याची घोषणा केलीय पण त्याचेही फार्म पोहचले नाहीत.

भोयर यांच्यासारखीच अवस्था विदर्भातील अनेक शेतकऱ्यांची आहे.

Loading...
Loading...

आधी १० हजारांच्या कर्जमाफीचे आश्वासन नंतर कर्जमाफीचा निर्णय आणि आता अपात्र शेतकऱ्यांना लाभ न मिळण्यासाठी अटी शर्थींचा फार्म भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. एकापाठोपाठ एक योजना शेतकऱ्यांसाठी सरकार आणतंय. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का फक्त आश्वासनांच्या योजना हाच खरा प्रश्न आहे.

पण अद्याप हे फार्म पोहचलेले नाही तर कर्जमाफीच काय हाही प्रश्न कायम आहे. दरम्यान बँकांना केंद्र सरकारने डोक्यावर चढवून ठेवले असल्यामुळे बँक अधिकारी ऐकत नसल्याच सांगत अशा बँक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सरकारच्या शेतकरी स्वावलंबन मिशनच्या किशोर तिवारी यांनी केलीआहे.

अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये म्हणून शेतकऱ्यांकडून अटी शर्थींचा फार्म  भरून घेणार अशी घोषणा  मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान दरवेळेस नव्या योजनेऐवजी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांनी बँकेत चकरा मारून निराशेच्या गर्तेत आले आहे. आता शेतकऱ्यांना पुन्हा सावकारी पाशात अडकण्याशिवाय पर्याय नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 09:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close