VIDEO : कर्ज न फेडू शकल्यामुळे शेतकरी झाला बेघर!

VIDEO : कर्ज न फेडू शकल्यामुळे शेतकरी झाला बेघर!

गृहकर्ज घेतल्यानंतर पडलेला दुष्काळ, मुलीचं लग्न आणि अर्धांगवायू असल्यामुळे स्वताच्या दवाखान्याचा खर्च यामुळं वयोवृद्ध शेतकऱ्याला कर्ज फेडता आल्याने बेघर होण्याची वेळ आली आहे.

  • Share this:

पंकज क्षीरसागर

परभणी, ता. 24 जुलै : ४ वर्षांपूर्वी एका खाजगी वित्त कंपनीकडून घर बांधणीसाठी दीड लाखांचं कर्ज काढणाऱ्या परभणीतल्या एका वयोवृद्ध शेतकऱ्यावर कर्ज न फेडू शकल्यामुळे बेघर होण्याची वेळ आली आहे. वित्त कंपनीने जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या परवानगीनंतर कायदेशीर बाबी पूर्ण करून शेतकऱ्याचं हे घर सील केलं. तर, गृहकर्ज घेतल्यानंतर पडलेला दुष्काळ, मुलीचं लग्न आणि अर्धांगवायू असल्यामुळे स्वताच्या दवाखान्याचा खर्च यामुळं वयोवृद्ध शेतकऱ्याला कर्ज फेडता आलं नसल्याची बाब समोर आली आहे.

भारतून अनेक जण बँकांचे खाजगी वित्त कंपन्यांचे अब्जो रुपये घेऊन पसार झाल्याच्या घटना ताज्याच आहेत त्यांच्यावर अद्याप कारवाई देखील करण्यात आली नाही. मात्र परभणीतील मुंजाभाऊ तिथे नामक ६० वर्षीय शेतकऱ्याने घरासाठी घेतलेलं कर्ज न फेडल्यामुळे त्याच्यावर कुटुंबासह बेघर होण्याची वेळ आली. ऐन पेरणी अन पावसाच्या काळातच घराला सील लागल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आलाय. घराबाहेर उघड्यावर संसार उपयोगी साहित्य टाकून ताडपत्रीच्या आडोशाला बसलेल्या मुंजाभाऊंना अर्धांगवायू झाला आहे. गेल्या ४ वर्षांपूर्वी त्यांनी परभणीतील एका वित्त कंपनीकडून घर बांधणीसाठी दीड लाखांचं कर्ज काढलं होतं. पण त्यानंतर पडलेला दुष्काळ, मुलीचं लग्न आणि स्वताच्या दवाखान्यामुळं त्यांना ते कर्ज फेडता आलं नाही. विशेष बाब म्हणजे, पेरणीचे आणि पाण्यापावसाचे दिवस असताना वित्त कंपनीने जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांची परवानगी घेऊन ही कारवाई केली आहे.

नारायण राणेंच्या पत्नीविरोधात अटक वाॅरंट जारी

भर पावसाळ्यात मुंजाभाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांवर ही परिस्थिती उद्भवल्यानं शेतकरी आघाडी आणि शेतकरी संघटनेने गावात जाऊन त्यांच्या घराचं सील काढलं आणि त्यांना पुन्हा घरात विसावा दिला. शेतकरी आघाडीचे संतोष गव्हाणे आणि शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी वित्त कंपनीच्या विरोधात गंभीर कारवाईचा इशारा दिलाय.

एकीकडं सरकार शेतकऱ्यांवरील बोजा कमी करण्यासाठी त्यांना कर्जमाफी देतंय, हमीभावात वाढ करुन देण्याची कवायत सुरु आहे. पण त्याचवेळी बदलत्या हवामानामुळं शेतीचं होणारं नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वित्त कंपन्यांनी मुंजाभाऊ तिथेंसारख्या शेतकऱ्यांवर किमान माणुसकी दाखवावी अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा..

अशोक चव्हाणांच्या गडात सेनेनं 'करून दाखवलं',हिमायतनगर नगरपंचायतीवर फडकला भगवा

Maratha Reservation : काँग्रेस खोटारडी, आरक्षणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न - तावडे

राजकारणाच्या पलिकडे जाऊन मराठा समाजाचा विचार करा – संभाजी 

 

First published: July 24, 2018, 9:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading