धुळ्यात फक्त १३ 'लाभार्थी', अजूनही २४४८ शेतकरी प्रतिक्षेत !

धुळ्यात फक्त १३ 'लाभार्थी', अजूनही २४४८ शेतकरी प्रतिक्षेत !

कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली ग्रीन लिस्ट प्रसिद्ध होऊन अनेक दिवस उलटूनही धुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ शेतकऱ्यांचेच कर्ज माफ झाल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

दिपक बोरसे, धुळे

23 नोव्हेंबर : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली ग्रीन लिस्ट प्रसिद्ध होऊन अनेक दिवस उलटूनही धुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ शेतकऱ्यांचेच कर्ज माफ झाल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.

धुळे जिल्ह्यातील सुमारे ८७ हजार ८६८ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यानुसार कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची शासनाने पहिली यादी जाहीर केली. या यादीत धुळे जिल्ह्यातील २४४८ शेतकऱ्यांची नावंही आलीत. मात्र प्रत्यक्षात फक्त १३ शेतकऱ्यांचेच कर्ज माफ झालंय.

या यादीतल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठवण्यात आली आहेत. मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडे पैसे आले की,  नाही किंवा या यादीबद्दल माहिती बँकांनी उपलब्ध केली नसल्याचं सांगून प्रशासनानं हात झटकले आहे.

आपल्यालाही कर्जमाफीचा लाभ मिळालाय का हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी दररोज संबंधित बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करतायेत.

कर्जमाफीची घोषणा होऊन तीन महिण्याचा कालवधी उलटला तरी अद्याप शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले नसल्याने शेतकरी आजही कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 06:44 PM IST

ताज्या बातम्या