रितेश देशमुखचं नाव वापरुन तरुणींना फसवणारा 'लखोबा लोखंडे' जेरबंद

स्वतः कास्टिंग डायरेक्टर असल्याचं सांगत आणि अभिनेता रितेश देशमुखचं नाव वापरणारा या हॅरीचं भलतंच सत्य समोर आलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2017 11:59 PM IST

रितेश देशमुखचं नाव वापरुन तरुणींना फसवणारा 'लखोबा लोखंडे' जेरबंद

प्रशांत बाग,नाशिक

 27 जून : चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत संधीसाधुंची संख्या काही कमी नाहीय. अशाच एका हॅरी नावाच्या फसवणाऱ्याविरुद्ध एका तरूणीनं पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. पाहता पाहता फसल्या गेलेल्या युवतींची संख्या वाढत गेली. आणि पोलीसही चक्राऊन गेले. या हॅरिचे कारनामे पाहिले तर 'तो मी नव्हेच' या नाटकातल्या लखोबा लोखंडे ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

नाशिकच्या याच मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका कास्टिंग डायरेक्टरनं आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार एका युवतीनं दाखल केली आणि सापळा रचून या हॅरी उर्फ हर्षद सपकाळेची चौकशी पोलिसांनी सुरू केली. स्वतः कास्टिंग डायरेक्टर असल्याचं सांगत आणि अभिनेता रितेश देशमुखचं नाव वापरणारा या हॅरीचं भलतंच सत्य समोर आलंय.

मॉडेलिंग शो आयोजित करून ग्लॅमरचं आकर्षण असलेल्या अनेक युवतींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या हॅरीच्या मोडस ऑपरेटिंगनं पोलिसही चक्रावून गेलेत. कारण आतापर्यंत राज्यातील जवळपास 25 ते 30 युवतींची या हॅरीनं आर्थिक फसवणूक केलीय.

समाजात खरं तर असे अनेक हॅरी रोजच आपले असे गोरखधंदे करत असतात. आणि ज्यांची फसवणूक झालीय ते बदनामीच्या भीतीनं शांत बसतात. त्यामुळे या हॅरीसारख्या भामट्यांचं फावतंय. पण कुटुंबाच्या साथीनं एखादी युवती हिम्मत दाखवते आणि अश्या घटना उघडकीला येतात.

Loading...

बऱ्याच वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोलच्या एका काझी नावाच्या व्यक्तीनं असे प्रताप केले होते, त्यावर आधारित "तो मी नव्हेच" या नाटकाला रसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. आता या हॅरीच्या नाना लिलांनी पुन्हा त्याची आठवण झालीय. हॅरी सध्या पोलीस कोठडीत आहे. तक्रारदार मुसलींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. सिनेमाच्या चमचमत्या दुनियेत जात असताना आपली कुठे फसवणूक होणार नाही ना याचीही काळजी तितकेच डोळसपणे घ्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 11:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...