News18 Lokmat

काँग्रेसमध्ये राहुल पर्वाला सुरुवात, राहुल गांधींच्या कारकिर्दीचा हा आढावा

पण खरा प्रश्न हा आहे की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी भाजपविरोधात काय रणनीती आखतात. मोदींचा वारू ते रोखू शकतील का, यावर त्यांच्या यश-अपयशाची मोजणी होणार, हे नक्की.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 16, 2017 03:27 PM IST

काँग्रेसमध्ये राहुल पर्वाला सुरुवात, राहुल गांधींच्या कारकिर्दीचा हा आढावा

16 डिसेंबर : काँग्रेसमध्ये तब्बल 19 वर्षांनंतर अखेर अध्यक्षपदी बदल झाले आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली आहे.  राहुल गांधी यांच्या निवडीमुळे काँग्रेसमध्ये आता राहुल पर्वाला सुरुवात झाली आहे.

स्वतःच्याच पक्षाच्या पंतप्रधानानं काढलेला अध्यादेश फाडून टाकला पाहिजे, असं म्हणणारे नेते म्हणजे राहुल गांधी. राजकारणात आल्यापासून राहुल गांधींनी अनेक वाद ओढावून घेतले. अलीकडेच, परदेशीत असताना ते म्हणाले, घराणेशाहीमुळे पद मिळालेला मी काही एकटा नाही.

२००४ साली राहुल गांधी पहिल्यांदा खासदार झाले. आपले वडील राजीव गांधींचा मतदारसंघ अमेठीहून त्यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर २००७ मध्ये ते युथ काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडिया, अर्थात एनएसयुआयचे अध्यक्ष झाले. २००९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारही केला. पण त्यांच्याकडे पहिली मोठी जबाबदार आली ती २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची. त्यांनी जोरदार प्रचार केला पण काँग्रेसचा पराभव झालाच.

मग आली २०१४ची लोकसभा निवडणूक. यावेळी, प्रचाराची जबाबदारी होती राहुल गांधींच्या खांद्यावर. त्यांनी देश पिंजून काढला, पण शेवटी, नरेंद्र मोदींच्या लाटेसमोर काँग्रेसच्या नौकेचा टीकाव लागला नाही. काँग्रेसला अवघ्या 44 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतरच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा पराभवच झाला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांनी नोटबंदी जाहीर केली. ह्याच्या इतकी चांगली संधी विरोधी पक्षाला शोधून सापडली नसती. पण डिसेंबर महिन्यात १० दिवसांसाठी राहुल परदेशात निघून गेले. अनेकंनी त्यांच्यावर यामुळे टीकाही केली.

मग २०१७ साली आल्या उत्तर प्रदेश निवडणुका. यावेळी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनं युती केली. त्याचाही काही उपयोग झाला नाही.

Loading...

राहुल गांधींची नवी आक्रमकता दिसू लागली ती गुजरात निवडणुकीच्या प्रचारात. नोटबंदी आणि जीएसटीवरून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. भाषणं अधिक अभ्यासू वाटू लागली. मुख्य म्हणजे, राहुल गांधी प्रचारात नियमित दिसू लागले. एका दिवशी ३ ते ४ सभा घेऊ लागले. एक मात्र नक्की, काँग्रेसची धुरा त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांची निर्णयक्षमता वाढेल. पण खरा प्रश्न हा आहे की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी भाजपविरोधात काय रणनीती आखतात. मोदींचा वारू ते रोखू शकतील का, यावर त्यांच्या यश-अपयशाची मोजणी होणार, हे नक्की.

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची परंपरा

 जवाहरलाल नेहरू- 3वर्षे

इंदिरा गांधी- 8वर्षे

-राजीव गांधी 8वर्षे

-सोनिया गांधी 19 वर्षे (सर्वात जास्त काळ)

- राहुल गांधी नवे अध्यक्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2017 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...