शेतकरी संपात फूट पाडण्याचा सरकारचा डाव फसला

शेतकरी संपात फूट पाडण्याचा सरकारचा डाव फसला

महाराष्ट्र बंद अखेर पार पडलाय. काही ठिकाणी चुटपुट हिंसक घटना सोडल्या तर बंद शांततेत आणि कडकडीतपणे पार पडला. पण पुणताब्यांच्या एका ग्रुपला हाताशी धरून शेतकऱ्यांच्या संपात फुट पाडण्याचा सरकारचा डाव फसल्याचंही स्पष्ट होतंय.

  • Share this:

महेंद्र मोरे, संदीप राजगोळकर आणि प्रशांत बाग, मुंबई

05 जून : महाराष्ट्र बंद अखेर पार पडलाय. काही ठिकाणी चुटपुट हिंसक घटना सोडल्या तर बंद शांततेत आणि कडकडीतपणे पार पडला. पण पुणताब्यांच्या एका ग्रुपला हाताशी धरून शेतकऱ्यांच्या संपात फुट पाडण्याचा सरकारचा डाव फसल्याचंही स्पष्ट होतंय.

हा पुरावा आहे, शेतकरी संप अजूनही संपलेला नाही याचा. राज्यात दिवसभर ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी भाजीपाला, दूध फेकून देण्यात आलं. संपाचं पुढचं भवितव्य नाशकातल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत ठरणार आहे. पण सरकारचे सहकारी असलेले मित्र पक्ष मुख्यमंत्र्यांना अजूनही जागं करतायत.

महाराष्ट्र बंदमध्ये वेगवेगळ्या शेतकरी संघटना सामिल झाल्या आणि संप यशस्वी केला. त्यात पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर राहीली ती सेना. सरकार तोडा आणि राज्य कराच्या भूमिकेत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.

शेतकरी संपाला आठवडा होत येतोय. दरम्यान काही ठिकाणी संपाला हिंसक वळण लागलं. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर आरोप केलेत. पण सरकारचे आरोप त्यांच्यावरच बुमरँग होताना दिसतायत.

शेतकऱ्यांचा संप हाताळण्यात सरकारला अपयश आलं ह्यात शंका नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त एका गटालाच का बोलावलं, बरं ज्यांना बोलावलं त्यांची कुवत किती याचा कशाचाच अंदाज मुख्यमंत्र्यांनी का घेतला नाही असे सवालही विचारले जातायत.

शेतकरी संपाचा क्लायमॅक्स संपलाय. संप, त्यातून होणारी आंदोलनं किती काळ रहाणार हे सांगणं आंदोलनकारी नेत्यांनाही जमत नाहीय. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आंदोलनकरी नेत्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे.

First published: June 5, 2017, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading