एक्झिट पोल किती खरे, किती खोटे ?

एक्झिट पोल किती खरे, किती खोटे ?

निवडणूक आणि एक्झिट पोल हे समिकरणचं बनलंय. पण जेव्हा जेव्हा एक्झिट पोल चुकले तेव्हा त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • Share this:

ओम प्रकाश, न्यूज18 हिंदी

14 डिसेंबर : गुजरात निवडणुकीचं मतदान संपलं आणि एक्झिट पोल जाहीर झाले. ज्या पक्षाच्या बाजूने अंदाज आला त्यांनी स्वागत केलंय आणि ज्या पक्षाच्या विरोधात आला त्याने एक्झिट पोलला खोटं ठरवलंय. पण, आजपर्यंतचे एक्झिट पोल पाहिले तर अनेक वेळा एक्झिट पोल चुकले आहे.

निवडणूक आणि एक्झिट पोल हे समिकरणचं बनलंय. पण जेव्हा जेव्हा एक्झिट पोल चुकले तेव्हा त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अलीकडेच्या काळात सोशल मीडियावर दररोज कुणी ना कुणी सर्व्हे करत आहे. पण आजपर्यंत या सर्व्हे करणाऱ्यांना कुणी विचारलं नाही. त्यामुळे हे सर्व्हे फक्त सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि टीव्ही चॅनलवर चर्चेसाठीच असतात का ?

एक्झिट पोल करणाऱ्या संस्था दावा करतात की, हा लोकांचा कौल आहे. पण खरं पाहिलं तर असे एक्झिट पोल नेहमी चुकीचे ठरले आहे. यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपला 324 जागा मिळतील तर कुणी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला 70 पैकी 67 जागा मिळतील. तर 2014 मध्ये कुणी असंही म्हटलं की भाजपच्या सुनामीपुढे कुणीही खातं उघडणार नाही.

राजकीय विश्लेषक आलोक भदौरिया म्हणतात, एक्झिट पोल खोटे तर नसतात पण पोल करत असताना सॅम्पल साईज कमी असल्यामुळे संशय निर्माण होतो. कारण काही संस्था या एखाद्या शहरातून फक्त 5000 लोकांना घेऊन सर्व्हे करतात. त्यामुळे हा काही संपूर्ण राज्याचा कौल तर असू शकत नाही. इतर देशातील मतदाराप्रमाणे भारतातला मतदार नाही. त्याला कधी भाजपकडून भीती वाटते तर कधी काँग्रेस, सपा, बसपा,आरजेडीची भीती वाटते त्यामुळे तो खरं कधी बोलत नाही. त्यामुळे एक्झिट पोलचे दावे खोटे ठरतात.

सीएसडीएसच्या सर्व्हेमध्ये सहभागी राहिलेले सेंटर फाॅर द स्टडी आॅफ सोसायटी अँड पाॅलिटिक्सचे प्राध्यापक ए.के. वर्मा म्हणतात, "सर्व्हे करण्यासाठी जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी मतदान होईपर्यंत वाट पाहण्याची गरज नसते. प्रत्येक आठव्या आणि दहाव्या मतदाराला विचारून आम्ही एक अंदाज तयार करतो. पण कधीकधी असा अंदाज घेणे अवघड होऊन जाते. पण हा अंदाज निकालाच्या आकड्याच्या आसपास तरी येतो. कधी कधी काही संस्था एक-दोन सम विचाराच्या लोकांसारखे 50 जणांचं मत घेतात मग परिणाम काय येईल?"

यासाठी जनगणना पाहून सर्व्हे केला पाहिजे. यामध्ये हिंदू, मुस्लिम, शिख, महिला, दलित, ओबीसी, गावं आणि शहरातील प्रत्येक गटातील व्यक्ती यात असले पाहिजे आणि हे राज्याच्या जनगणनेच्या टक्केवारी ठरली पाहिजे.

यासाठी सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांची सोशल प्रोफाईल तयार होते. ज्याच्या सर्व्हेमध्ये यासारखी समानात असेल तो सर्व्हे खरा ठरेल. मग भलेही 50 लोकांचा सर्व्हे करा किंवा दोन हजार लोकांचा सर्व्हे करा कौल तोच मिळेल जो जनतेच्या मनात असेल.

First published: December 14, 2017, 10:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading