डाॅक्टरांच्या नाड्या मांत्रिकाच्या हातात, नाशिकच्या रुग्णालयात 'राशींच्या' खड्यांचा बाजार

डॉक्टरांच्या भरवशावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह आहे की आपण इथं का आलो

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2018 04:22 PM IST

डाॅक्टरांच्या नाड्या मांत्रिकाच्या हातात, नाशिकच्या रुग्णालयात 'राशींच्या' खड्यांचा बाजार

कपिल भास्कर,नाशिक

नाशिक, 24 एप्रिल : अंधश्रद्धा ही आपल्या समाजात किती खोलवर रुजलीय याचं एक धक्कादायक उदाहरण नाशिकमध्ये समोर आलंय. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनीच "राशींच्या' खड्यांचा बाजार मांडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय.

डॉक्टरांच्या भरवशावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह आहे की आपण इथं का आलो...त्याचं कारण म्हणजे साडेसाती घालवण्यासाठी खुद्द डॉक्टरांनीच आपल्या नाड्या मांत्रिकाच्या हातात दिल्यात.. तंत्रमंत्र आणि राशीच्या खड्यांचा आधार घेतलाय. जिल्हा रुग्णालयाच्या एमर्जन्सी विभागात वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. महेश खेरकर यांनी प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांच्या सोबत बसून राशींच्या खड्यांचे प्रयोग केल्यानं रुग्णांना धक्का बसलाय.

रुग्णालयात डॉक्टरांकडून झालेला हा प्रकार चुकीचा असल्याचं सांगत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलंय.

एकूणच काय तर रुग्णांना जीवदान देणारे देवदूत म्हणणारे डॉक्टर पाच वर्षं वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतरही आपलं भविष्य खड्यांमध्ये शोधत असतील तर रुग्णांनी आपलं भविष्यं कुठे शोधावं? हा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2018 07:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close