माजी आमदार आणि आमदारांनी नाकारली कर्जमाफी, इतर नेते हे करतील का ?

माजी आमदार आणि आमदारांनी नाकारली कर्जमाफी, इतर नेते हे करतील का ?

अंमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांनी कर्जमाफी नाकारलीये.

  • Share this:

13 जून : शेतकऱ्यांच्या ज्या ज्या वेळी कर्जमाफी देण्यात आली त्या त्या वेळी तिचा गैरफायदा घेण्यात आला. यात काही राजकीय नेतेही मागं नव्हते. पण अंमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांनी कर्जमाफी नाकारलीये.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आवाहन करताना सरकारने आवश्यकता नसलेल्या सधन शेतकऱ्यांना कर्जमाफी न घेण्याचे आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत साहेबराव पाटील यांनी या योजनेचा लाभ घेणार नाही असं ठरवलं आहे. महाराष्ट्र विधान मंडळ माजी सदस्य म्हणून आपणांस 50 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळत असल्याने माझ्या कुटुंबियांना शासनानं जाहीर केलेल्या कर्ज माफीची आवश्यकता नाही. तरी मला या लाभार्थी यादीतून वगळावं अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील, त्यांच्या पत्नी अमळनेरच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी सरकारनेकडे केली आहे. राहुल कुल यांनीही याच निर्णयाचं अनुकरण केलंय.

2008 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली होती. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी कर्जमाफीचा फायदा उचलला होता. पण या दोन नेत्यांनी केलेल्या कृतीचं अनुकरण इतर नेते करतील का असा प्रश्न विचारला जातोय.

कोण आहे साहेबराव पाटील ?

साहेबराव पाटील हे उत्तम शेतकरी आहेत, पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांवर 6 लाख रुपयांचे पीक कर्ज आहे. माजी आमदार म्हणून येणारे निवृत्ती वेतन आपल्या कुटुंबियांसाठी पुरेसे आहेत, त्यात आपण समाधानी असल्याचं साहेबराव पाटील यांनी म्हटले आहे. मी आणि माझ्या पत्नीने आता कर्जमाफी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर लोकप्रतिनिधी आणि साधन शेतकऱ्यांनी ज्यांना खरोखर गरज नाही, त्यांनी कर्जमाफी न घेता, इतर शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा कसा जास्तच जास्त लाभ पोहोचेल याचा विचार करावा, असं आवाहन ही साहेबराव पाटील यांनी केले आहे.

First published: June 13, 2017, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading