VIDEO मानलं पंतप्रधानांना, स्वत: सांडलेली कॉफी स्वत:च केली साफ !

VIDEO मानलं पंतप्रधानांना, स्वत: सांडलेली कॉफी स्वत:च केली साफ !

असे पंतप्रधान होणे नाही ! नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रट यांनी पुन्हा एकदा अशी कामगिरी केली आहे की ज्याचा इतर राजकारण्यांनी आदर्श घेतला पाहिजे.

  • Share this:

नेदरलँड, ता. 05 मे : नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रट यांनी पुन्हा एकदा अशी कामगिरी केली आहे की ज्याचा इतर राजकारण्यांनी आदर्श घेतला पाहिजे. ते झालं असं की, संसदेतून जात असतान मार्क रट यांच्या हातातून कॉफी खाली सांडली आणि त्यांनी ती साफ केली आणि चुपचाप तिथून निघून गेले.

संसदेतून जात असताना रट यांच्या हातून कॉफीचा ग्लास खाली पडला आणि सगळी कॉफी जमिनीवर सांडली. यावर न चिडता त्यांनी तिथे उभं असलेल्या कर्मचाऱ्यांकडून फडकं घेतलं आणि ती कॉफी स्वत: साफ केली. बरं इतकंच नाही तर रट यांनी दरवाज्यावर उडालेली कॉफीही फडक्याने साफ करून घेतली. जेव्हा रट साफसफाई करत होते तेव्हा तिथे असलेले कर्मचारी त्यांच्यासाठी कौतूकाने टाळ्या वाजवत होते.

मार्क रट यांचा हा सफाई करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. त्यांच्या कामगिरीचं सगळ्यांकडूनच कौतूक केलं जातय. पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार हामिद मीर यांनी या व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी लिहलं की, 'कधी कधी पंतप्रधान सफाई कामगारांचं काम करतात पण आपल्याकडून मात्र ते होत नाही. फक्त नेदरलँडचे पंतप्रधानच अशी सफाई करू शकतात. मला त्यांची नम्रता पटली, म्हणून ते डच लोकांमध्ये लोकप्रिय आहे.'

खरंतर मार्क रट हे नेहमी साधेपणानेच राहतात. ते सायकलवर प्रवास करतात. पंतप्रधान कार्यालयाबाहेर त्यांची सायकल पार्क केलेली असते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सायकल भेट दिली आहे.

First published: June 5, 2018, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading