ही चेंगराचेंगरी नाही हत्याकांड,सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,शिवसेनेची मागणी

ही चेंगराचेंगरी नाही हत्याकांड,सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,शिवसेनेची मागणी

शिवसेनेनं ही चेंगराचेंगरी नाही तर हत्याकांड असल्याचा आरोप केलाय. तर दुसरीकडे पुलासाठी पाठपुरावा केला पण रेल्वेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप खासदा राहुल शेवाळेंनी केलाय.

  • Share this:

रफिक मुल्ला, मुंबई

29 सप्टेंबर : एलफिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचं आता राजकारण सुरू झालंय. शिवसेनेनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. तर काँग्रेसनंही सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर आता राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. शिवसेनेनं ही चेंगराचेंगरी नाही तर हत्याकांड असल्याचा आरोप केलाय. तर दुसरीकडे पुलासाठी पाठपुरावा केला पण रेल्वेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप खासदा राहुल शेवाळेंनी केलाय.

रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी 45 हजार कोटी गेल्या वर्षी मंजूर झाले. पण त्याचं पुढं काय झालं असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी उपस्थित केलाय.

दुर्घटनेनंतर जागं झालेल्या रेल्वे मंत्रालयानं रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे आदेश दिले.

रेल्वे आता दुरुस्तीच्या कामांना लागणार आहे. एलफिन्स्टनसारखी एखादी दुर्घटना होण्याची रेल्वे वाट पाहत होती का असा संतप्त सवाल विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 07:55 PM IST

ताज्या बातम्या