रेल्वेचा प्रवास ठरला शेवटचा, हिलोनी आणि मसूद यांची करूण कहाणी

रेल्वेचा प्रवास ठरला शेवटचा, हिलोनी आणि मसूद यांची करूण कहाणी

एलफिस्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झालाय. तर 38 जण जखमी आहेत. कुणाचे वडील, तर कुणाचा भाऊ...

  • Share this:

29 सप्टेंबर : एलफिस्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झालाय. तर 38 जण जखमी आहेत. कुणाचे वडील, तर कुणाचा भाऊ...रुग्णालयात या मृतांच्या नातेवाईकांची अवस्था मन पिळवाटून टाकणारी होती.

फोटोत दिसणारी ही हिलोनी देढिया...चार्टर्ड अकाऊटंट असलेल्या हिलोनीचा आजचा रेल्वेचा प्रवास शेवटचा ठरला. सहा महिन्यांपूर्वीच सीएची परीक्षा पास होऊन तिनं अॅक्सीस बँकेत नोकरी सुरू केली होती. तेव्हापासून रोज सकाळी 10.30 च्या दरम्यान ती एलफिस्टनला उतरायची. पण आजची सकाळ तिच्यासाठी शेवटची ठरली. सकाळी निघालेली हिलोनी तिच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्येच सापडली. तीही मृतावस्थेत.

बत्तीस वर्षांचा मसूद शेख आलम आणि त्याचा भाऊ गेली 20 वर्ष गोवंडीहून परळला यायचे. परळच्या एका दुकानात शिलाईचं काम करायचे. आज सकाळीही नेहमीसारखंच ते कामावर जायला निघाले होते, पण दुकानापर्यंत ते पोहचूच शकले नाही. स्टेशनवरच त्यांच्यावर काळानं घाला घातला. स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मसूद यांचा मृत्यू झाला.

मसुद आणि हिलोनी सारख्या 22 जणांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावलाय. त्यातल्या अनेकांवर आपल्या कुटुंबाची जबाबदारी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 09:31 PM IST

ताज्या बातम्या