एलफिन्स्टन चेंगराचेंगरीला अरुंद पूल कारणीभूत ?

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीला अरुंद पूल कारणीभूत ?

एलफिन्स्टन आणि परळ रेल्वे स्टेशनच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीला अरुंद पूल कारणीभूत असल्याचा आरोप होतोय.

  • Share this:

29 सप्टेंबर : एलफिन्स्टन आणि परळ रेल्वे स्टेशनच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीला अरुंद पूल कारणीभूत असल्याचा आरोप होतोय.

एलफिस्टन रेल्वे स्टेशनवर झालेली चेंगराचेंगरी चिंचोळ्या फूट ओव्हरब्रिजमुळे झाल्याचा आरोप होऊ लागलाय. ब्रिटीशकाळातले हे फूटओव्हर ब्रिज आहेत. दरम्यानच्या काळात परळ आणि एलफिस्टन स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली पण फूट ओव्हर ब्रिजचा आकार तेवढाच राहिला. रेल्वे प्रशासनाने या पुलांसाठी पर्याय शोधलाच नाही. त्यामुळे रोज सकाळ आणि संध्याकाळच्या काळात या अरुंद पुलांवर तुफान गर्दी होते. ज्या जिन्यावरून उतरताना चेंगराचेंगरी झाली तो ब्रिजही अतिशय चिंचोळा आहे. रेल्वेच्या याच बेपर्वा वृत्तीमुळे अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय.

प्रवासी संघटनांनी या पुलांबाबत माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे पाठपुरावा केला होता. पण दुर्दैवानं त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

मध्य रेल्वेवर दादरच्या दिशेनं पूल बांधण्यात आला. पण तो अतिशय गैरसोईचा झालाय. रेल्वेनं या दुर्घटनेपासून धडा घेऊन एलफिस्टन फूट ओव्हरब्रिजचं नव्यानं बांधकाम होईल ही अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 09:45 PM IST

ताज्या बातम्या