मुंबई पालिकेच्या मराठी शाळांमधील प्रवेशांच्या संख्येत घट

मुंबई पालिकेच्या मराठी शाळांमधील प्रवेशांच्या संख्येत घट

या काळात शैक्षणिक अर्थसंकल्पात दुप्पटीने वाढ झाली असली तरी शैक्षणिक दर्जा खालावल्यामुळे विद्यार्थी मिळत नाहीये. अशी माहिती एका सामाजिक संस्थेनं केलेल्या सर्व्हेक्षणात पुढे आलीय.

  • Share this:

13 डिसेंबर : गेल्या आठ वर्षात बीएमसी शाळांमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निम्यावर आलीये. या काळात शैक्षणिक अर्थसंकल्पात दुप्पटीने वाढ झाली असली तरी शैक्षणिक दर्जा खालावल्यामुळे विद्यार्थी मिळत नाहीये. अशी माहिती एका सामाजिक संस्थेनं केलेल्या सर्व्हेक्षणात पुढे आलीय.

देशातली सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाची अवस्था केविलवाणी होत चाललीये. प्रजा फाऊंडेशननं केलेल्या सर्व्हेक्षणात धक्कादायक बाबी समोर आल्यात.

प्रत्येक विद्यार्थ्यावर महापालिका वर्षाला 52 हजार रुपये खर्च करते. पण मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटलीय. बीएमसीच्या शाळांमधील गळतीचं प्रमाण 8 टक्के आहे. शैक्षणिक गुणवत्ता खालावल्यानं पालिका शाळांना गळती लागल्याचा आरोप पालकांनी केलाय.

महापौर महाडेश्वर यांनी प्रजा फाऊंडेशनचे निष्कर्ष फेटाळून लावलेत. विद्यार्थ्यांच्या गळतीला पालकच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

बीएमसीच्या खालावत जाणाऱ्या शैक्षणिक स्थितीसाठी कुणी ही जबाबदार असलं तरी त्याचा परिणाम मात्र मुंबईच्या भविष्यावर होतोय. केवळ शैक्षणिक अर्थसंकल्पात वाढ करुन गुणवत्ता सुधारता येते या मानसिकतेतून बाहेर पडणं बीएमसीसाठी गरजेचं आहे

First published: December 13, 2017, 7:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading