S M L

'घराला घरपण देणारे' डीएसकेंनाच आर्थिक 'घरघर' !

तब्बल ८ हजार गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे परत न देण्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत

Sachin Salve | Updated On: Aug 5, 2017 11:37 PM IST

'घराला घरपण देणारे' डीएसकेंनाच आर्थिक 'घरघर' !

वैभव सोनवणे, पुणे  

05 आॅगस्ट : पुण्यात अत्यंत व्यावसायिक आणि सज्जन बांधकाम व्यावसायिक अशी प्रतिमा असलेल्या डी.एस.कुलकर्णी आणि त्यांचा व्यवसाय सध्या आर्थिक अडचणीत सापडलाय. तब्बल ८ हजार गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे परत न देण्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...

डीएसके अर्थात डी.एस.कुलकर्णी...पुण्यातलं बांधकाम व्यवसायातलं मोठं नाव... एकीकडे बिल्डर हा फसवणुकीशी समानार्थी शब्द झालेला असताना डीएसके मात्र प्रामाणिकपणा, सचोटी यामुळे कायम चर्चेत राहिले. जवळपास ३७ वर्ष त्यांनी बांधकाम क्षेत्रात मोठं नाव केलं. ऑटोमोबाईल, शिक्षण असे अनेक  व्यवसायही सुरू केलं, ते भरभराटीला ही आणले. डीएसकेवर पुणेकरांचा भरोसा होता. त्या आधारावरच जवळपास ८ हजार पुणेकरांनी त्यांची आपल्या आयुष्याची जमापुंजी फिक्स डिपॉजिट म्हणून गुंतवली. काहींनी गृहप्रकल्पामध्ये पैसे गुंतवले पण गेल्या १० महिन्यापासून डीएसकेकडून ना व्याज मिळतंय.

मुंबईच्या गिरगावचे हे आजोबा मुंबईहून पुण्याला डीएसकेकडे भरलेल्या एफडी चे पैसे मिळतात का ते पाहण्यासाठी आलेत.  निवृत्तीनंतर मिळालेले सगळे पैसे हे जास्त व्याज मिळतंय म्हणून डीएसकेकडे गुंतवले. विशेष म्हणजे जास्त व्याज मिळतंय म्हटल्यानंतर बँक आणि पोस्टात असलेले पैसे काढून ते इथं गुंतवले.

डीएसके यांच्या व्यवसायात आलेली ही आर्थिक अडचण ही त्यांच्या कुटुंबियांना फायदा पोहोचवण्याच्या आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे फिरवण्याचा उठाठेवीमुळे आल्याचे रिअल इस्टेट ब्लॉगर विजय कुंभार सांगतात.

Loading...
Loading...

डीएसके या सगळ्या परिस्थितीत आजही गुंतवणूकदारांना भेटले पण पुन्हा त्यांनी गुंतवणूकदारांना नवीन आश्वासन दिलंय. रिअल इस्टेटमधली मंदी, नोटाबंदीचा फटका बसल्याचा दावा डीएसकेंचा आहे. जानेवारीपर्यंत हे सगळे सुरळीत होईल असा दावा डीएसकेंनी केलाय.

डीएसके यांच्या पैसे परत ना देण्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झालेत. डीएसकेंच्या कार्यालयाबाहेर गर्दीही केली होती मात्र पैसे मिळतील आणि डीएसके पैसे बुडवणार नाहीत हा विश्वास डीएसकेंच्या आजपर्यंतच्या नावलौकिकामुळे त्यांना वाटतोय. रोजच्या चरितार्थाचे, उपचारांसाठी लागणाऱ्या पैश्यांची काळजी त्यांना सतत अस्वस्थ करतेय. त्यामुळे एकेकाळी घराला घरपण देणाऱ्या डीएसकेंकडून आता आपली आयुष्य तर उजाडली जाणार नाहीत ना अशी भीती त्यांना सतावतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2017 10:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close